महापालिका आयुक्ताचा ‘रिंग’मध्ये अप्रत्यक्ष सहभाग?; मुख्यमंत्र्याकडे चाैकशीची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/201707071642412682_news-in-marathi-notice-to-Commissioner-about-RTI-center_SECVPF-1.jpg)
- भाजप नगरसेवक तुषार कामठे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
- पारदर्शक आणि शाश्वत विकासाच्या गप्पा मारणा-या आयुक्तांचे आर्थिक हिंतसबंध गुंतल्याची शक्यता?
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेच्या कामात रिंग झाल्याचे उघड झाले आहे. त्या ठेकेदारांची चाैकशी करुन कारवाई करा, असे स्थायी समितीने सुचना देवून फेरनिविदा मागविण्याचा आदेश दिले. तसेच त्या रस्त्यांच्या कामात रिंगचे पुरावे देवूनही ठेकेदारांवर आयुक्त कोणतीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे पारदर्शक आणि शाश्वत विकासाच्या पोकळ गप्पा आयुक्त हे मारत असून त्यांचा रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेत अप्रत्यक्ष सहभाग आहे का? त्यांचे ठेकेदारांशी आर्थिक हिंतसंबंध आहे का? याविषयी चाैकशी करुन दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी केली.
यासंर्दभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन फॅक्स व ई-मेल द्वारे पाठविले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यात येणार होता. मात्र, गेल्या अनेक दिवसापासून अनेक ठेकेदारांनी महापालिकेची तिजोरीवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. स्थापत्य विषयक कामात अनेक ठेकेदार संगनमताने रिंग करीत आहेत. या रिंगमध्ये स्थापत्य विभागातील शहर अभियंता, सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या आर्थिंक हिंतसबंध ठेवून मिलीभगतीने रिंगचे प्रकार सुरु केले आहेत. त्यामुळे करदात्या नागरिकांचे नुकसान होवू लागले आहे. त्यात ठेकेदार आणि अधिका-यांचा फायदा होवू लागला आहे.
कित्येकदा निविदा काढताना भांडार विभाग, स्थापत्य विभाग अनेक जाचक अटी, नियम निविदेत टाकतात. त्यामुळे सर्वसामान्य ठेकेदारांना निविदा भरणे अशक्य होते. जे नेहमीचे रिंग करणारे पाच ते सहा ठेकेदार एकमेकांना पुरक सांभाळून हे रिंगचे काम करु लागले आहेत.
यासंर्दभात आयुक्तांना पुराव्यानिशी कागदपत्रे दिली. त्या रिंगमधील सहभागी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई मागणी करुन त्याना स्मरणपत्रे दिली. त्याकडे आयुक्त जाणिवपु्र्वक दुर्लक्ष करीत आहेत. उलट आयुक्तांनी करदात्या नागरिकांचे पैसे वाचविण्याएेवजी ठेकेदारांना कसा आर्थिक फायदा होईल, याकडे सर्वाधिक लक्ष दिले. परंतू, आयुक्तांनी शहरातील कोणत्याच कामात रिंग झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे रिंग प्रकरणात आयुक्तांचे हात बरबटलेले असून त्यांचे हिंतसंबंध गुंतल्याचे दिसून येत आहे. आयुक्तांची रिंग प्रकरणावर चाैकशी करुन त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशीही कामठे यांनी केली आहे.