जळगावात ‘नवरी पार्लरला गेली अन्ं गायब’ झाली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/cover.jpg)
जळगाव – शहरातील खोटेनगर परिसरात दारात मंडप सजविण्यात आलेला. दुपारी बाराची वेळ. वऱ्हाडी मंडळी येते. नवरदेवाला पारावरून वाजतगाजत आणले जाते. नवरदेव स्टेजवर चढतो अन् नवरी मुलगी पळाली, पळाली, पळाली, असे वृत्त वाऱ्यासारखे मंडपात पोहोचते. या प्रकरणाची वाच्चता होऊ न देता वऱ्हाडी मंडळी माघारी पोहचतात.
खोटेनगर परिसरातील रहिवासी कांचन (नाव बदलले आहे) हिचे जीवन (नाव बदलले आहे) यांची बोलणी झाल्यानंतर या भागातील एका कुटुंबात गेल्या आठ दिवसांपासून लग्नाची धामधूम सुरू होती. अधिक माहिती घेतली असती या विवाहाला या मुलीने नकार दिल्याची माहिती प्राप्त झाली. मात्र मुलीचे फारसे मनावर न घेता या कुटुंबातील व्यक्तीने लग्न ठरविले. तारीख निश्चित झाली. ठरल्याप्रमाणे रविवारी (ता. १०) दुपारी वऱ्हाडी मंडळी आली. नवरदेवला पाऱ्यावर गेला. नवरदेवाला मित्र मंडळी नातेवाईक सगेसोयरे नाचत गाजत त्याला मंडपात आणतात. ब्राम्हण मंडळी बॅण्डवाले आपापल्या कामात मग्न असतात. नवरदेव स्टेजवर चढतो.
दुसरीकडे मुलगी पार्लरला जाते म्हणून घराबाहेर पडली होती. यानंतर ती परतीलच नाही. नवरदेव स्टेजवर गेल्यानंतर मंडळात मुलगी येत नाही म्हणून कुजबूज सुरू होते. मुलगी पळाली अशी चर्चा रंगते. याबाबत जास्त वाच्चता होऊ नये, यासाठी दोन्ही मंडळींमध्ये चर्चा करतात. वऱ्हाडी मंडळी काहीही एक बोलता माघारी फिरतात.