Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
धक्कादायक: चिंचवडमध्ये चिमुरडीचा जळालेला मृतदेह सापडला
![Unnatural atrocities on an eleven-year-old boy in Alandi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/crime-2.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिंचवड गावातून थेरगावकडे जाणा-या पवना नदीपात्रावरील उड्डानपुलालगत गवतामध्ये एक ते दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. या घटनेने चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे. काही तासांपूर्वी हा मृतदेह नागरिकांच्या निदर्शनास आला आहे.
चिमुरडीचा मृतदेह पाहणा-या नागरिकांनी चिंचवड पोलिसांना माहिती दिली. त्यावर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे, अशी माहिती नागरिकांनी दिली. चिमुरडीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.