Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भारतीय लष्कराने केला, 5 दहशतवाद्यांचा खात्मा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/kulgam-encounter_201902194204.jpg)
श्रीनगर – दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये भारतीय लष्कराने रविवारी (10 फेब्रुवारी) दहशतवादीविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केलम परिसरात दहशतवादीलपल्याची माहिती जवानांना शनिवारी (9 फेब्रुवारी) उशिरा रात्री मिळाली. यानंतर 9 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू काश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी केलम गावाला घेराव घातला आणि परिसरात शोध मोहीम करण्यास सुरुवात केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
https://twitter.com/ANI/status/1094505611411288064