Breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुण्यात किरकोळ वादातून मित्राची हत्या

पुण्यातील नऱ्हे आंबेगाव परिसरात किरकोळ वादातून मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास सिंहगड पोलीस करीत आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. किरण काटकर वय 28 वर्ष असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे येथील अभिनव कॉलेज मार्गावर सर्व्हे क्रमांक 8 मधील मोकळ्या जागेतील पत्राच्या शेडमध्ये सोमवारी रात्री किरण आणि त्याचा मित्र पप्पू पाटील या दोघांमध्ये भाजी आणण्यावरून वाद झाला. या वादातून पहाटेच्या सुमारास आरोपीने किरण याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. अशी माहिती देण्यात आली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button