मुख्यमंत्री म्हणतात, चहावाल्याच्या नादी लागू नका ; अरे बाबा 4 वर्षांपूर्वी सांगायचं ना – धनंजय मुंडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/मुंडे-1.jpg)
शिरूर : माझ्या बहिणीने लहान मुलांच्या चिक्की खाल्या, विनोद तावड़े यांनी महापुरूषांच्या फोटोत पैसे खाल्ले, उद्योग मंत्र्यानी प्लॉट विक्रीत पैसे खाल्ले, आदिवासी मंत्र्यानी मुलांच्या सहित्यात पैसे खाल्ले, चहा पाजण्यात पैसे खाल्ले, राज्यात 90 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. मी मुख्यमंत्र्याना पुरावे दिले आहेत, मात्र मुख्यमंत्री गप्प आहेत, हिंमत असेल तर त्यांनी न्यायालयीन समिती नेमून या घोटाळयांची चौकशी करावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी दिले. तसेच मुख्यमंत्री म्हणतात चहावाल्याच्या नादी लागू नका, अरे बाबा 4 वर्षांपूर्वी सांगायचं ना, कशाला कोण नादी लागले असते,असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा पुणे जिल्ह्यात असून, शिरूर येथे आज (मंगळवार) सकाळी सभा झाली. यावेळी धनंजय मुंडे यांनी भाजप व मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
धनंजय मुंडे म्हणाले, की मी पाच पिड्यांपासून शेतकरी आहे, मी गाय सुद्धा धुवू शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य सभागृहात केल होते. मात्र अडचण एक आहे, मला खाली बसता येत नाही. मी मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी गाय घेऊन जातो, त्यांनी गाईचे दुध धुवुन दाखवावे आणि मी शेतकरी आहे हे सिद्ध करावे. मोदीसाहेब 6 कोटी शौचालय बांधायला आमची हरकत नाही, मात्र आमच्या देशातील लोक मोठ्या प्रमाणात उपाशी झोपत आहेत. खायेगा इंडिया तबी तो सुबह शौचालय जायेगा इंडिया, असेही ते यावेळी म्हणाले.