चीनमधील कोलसा खाणीतल्या अपघातात 19 ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/coal-mine-.jpg)
बिजींग-चीनच्या उत्तर भागातील एका कोळसा खाण कोसळून झालेल्या अपघातामध्ये 19 जण मरण पवले आहेत. तर दोघेजण अद्यापही गाडले गेले आहेत. शांक्सि प्रांतातील कोळसा खाणीमध्ये शनिवारी एकूण 87 कामगार काम करत होते, तेंव्हा हा अपघात झाला, असे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. गाडल्या गेलेल्या दोन खाण कामगारांचा शोध सुरु असून 66 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
खाण खचण्यामागील नेमक्या कारणाचा तपास केला जात आहे. चीनमध्ये खाणींमध्ये होणाऱ्या अपघातांची संख्या खूप वाढली आहे. या खाणींमध्ये सुरक्षिततेच्या उपाय योजनांची वानवा असते, असे निदर्शनास आले आहे. बेकायदेशीर खाण उद्योगाला आळा घालण्यासाठी सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नैऋत्य चीनमधील अशाच एका खाण अपघातामध्ये 7 कामगारांचा मृत्यू झाला होता. तर ऑक्टोबरमध्ये 21 खाण कामगार शाण्दोंग प्रांतातील बोगद्यातल्या दुर्घटनेमध्ये अडकून पडले होते. त्यापैकी केवळ एकाला वाचवण्यात यश आले होते.