कॅब चालकाने केला प्रवासी तरुणीचा विनयभंग, चालक अटकेत
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – कॅब चालकाने प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार म्हाळुंगे परिसरात घडला आहे. याप्रकरणी कॅब चालकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 1) म्हाळुंगे गावातील राधा चौकात सायंकाळी नवच्या सुमारास घडला.
संतोष चंद्रकांत शेटे (वय 31, रा. गजानन मंदिरापुढे, शाहू कॉलेज रोड, पर्वती, दत्तवाडी, पुणे) या कॅबचालकाला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलिसांत तक्रार केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शेटे हा कॅबचालक आहे. त्याच्या शेअरिंग कॅबमधून (एमएच 12, केएन 5937) 28 वर्षीय तरुणी प्रवास करत होती. दरम्यान, शेटेने प्रवासी तरुणीला अश्लिल शब्दांत संभाषण केले. त्यावरून संबंधित पीडित तरुणीने पोलिसांत तक्रारी अर्ज दिला. त्यावरून शेटे याला अटक केली असून त्याच्यावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.