Breaking-newsराष्ट्रिय
ख्रिसमस निमित्त तयार करण्यात आला 750 किलोंचा केक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Cake-1.jpg)
नाताळचा सण सेलिब्रेट करण्यास सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये 750 किलो वजनाचा प्लम केक खास नाताळनिमित्त तयार करण्यात आला. हा केक पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्याचवेळी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अनेकांनी एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या. अहमदाबाद येथील का मॉलमध्ये हा केक आणला गेला होता. सिक्रेट सँटा हा खेळ खेळण्याची प्रथा यादिवशी आहे. याच खेळात हा केक तयार करून आणण्यात आला. या 750 किलोच्या केकवर मोठ्या अक्षरात सिक्रेट सँटा असे लिहिण्यात आले होते. तसेच या केकवर सांताक्लॉज आणि आइसमन यांचीही चित्रे रेखाटण्यात आली आहेत.