राजकुमार राव पुन्हा करणार हॉरर फिल्म
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/rajkumar-rao-.jpg)
“स्त्री’ या हॉररपटाने राजकुमार रावच्या करिअरमध्ये एक हॉरर भर घातली. आता राजकुमार राव आणखीन एक हॉररपट करणार आहे. “स्त्री’ ला बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी यश मिळाल्यावर प्रोड्युसर दिनेश विजन आणि राजकुमार राव मिळून एक भन्नाट हॉरर कॉमेडी फिल्म करणार आहेत. यावेळी राजकुमार रावच्या बरोबर वरुण शर्माही असणार आहे. अद्याप या हॉररपटाचे शिर्षक निश्चित झालेले नाही. या नवीन सिनेमाचे शुटिंग पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होईल आणि 2020 च्या सुमारास तो रिलीज होणार आहे.
यामध्ये राजकुमार राव एका बदमाशाच्या रोलमध्ये दिसणार आहे. त्यामध्ये त्याला काही भुतांचा सामना करायला लागणार आहे. या भुतांमुळेच या बदमाशाला आपली योजना बदलायला लागते, अशी ही विनोदी कथा असणार आहे. राजकुमार राव आणि मौनी रॉयचा “मेड इन चायना’ पुढील वर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. हा एक कॉमेडी सिनेमा असेल आणि त्यामध्ये राजकुमार एका गुजराथी व्यापाऱ्याच्या रोलमध्ये असणार आहे. आपल्या व्यवसायात हा व्यापारी कसा यशस्वी बनतो, याची ही कथा असणार आहे. दरम्यान त्याच्या हॉररपटाची तयारीही पूर्ण होईल.