ताज्या घडामोडीमनोरंजन

‘येरे येरे पैसा 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सलमान खान मराठी चित्रपट येरे येरे पैसामध्ये झळकणार

मुंबई : ‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा 2 ’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले. या सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर याची विशेष उपस्थिती होती. या वेळी सलमान खान याने गाण्याचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

या टायटल साँगला वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजाने अधिकच रंगत आणली असून अमितराज यांनी यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटातील इतर गाण्यांना पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. हे गाणे सचिन पाठक यांनी लिहिले आहे. ‘येरे येरे पैसा ३’ या गाण्यातील सर्व कलाकारांची एनर्जी पाहून हा भाग आणखी धमाल आणि मनोरंजनाने भरलेला असणार, याबद्दल कोणतीही शंका नाही.

या गाण्याबद्दल आणि चित्रपटाबद्दल सलमान खान म्हणाला की, “हे गाणे अप्रतिम झाले आहे. गाण्यावरूनच चित्रपट काय जबरदस्त असेल याचा अंदाज येतोय. चित्रपटाची संपूर्ण टीम जबरदस्त आहे. या सगळ्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि या चित्रपटाच्या चौथ्या भागात मला सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.”

या म्युजिक लाँच कार्यक्रमाबद्दल बोलताना दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ‘येरे येरे पैसा 3’ ही केवळ फ्रँचाईजी नाही, तर प्रेक्षकांशी आमचा भावनिक संबंध आहे. या भागात अधिक मोठं, धडाकेबाज आणि थरारक काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा –  ‘मुलाचं नाईट लाइफ कमी केलं असतं तर..’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला नितेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर

निर्माते अमेय विनोद खोपकर आणि निनाद बत्तीन म्हणाले, “सलमान खानने वेळात वेळ काढून आमच्यासाठी या सोहळ्याला उपस्थित राहाणं, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्याच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या टायटल साँगच्या माध्यमातून चित्रपटाची झलक प्रेक्षकांसमोर आली आहे, आता चित्रपटगृहात पूर्ण धमाका अनुभवायला मिळेल.”

धर्मा प्रॉडक्शन्सचे अपूर्व मेहता म्हणाले, “मराठी सिनेमाची गुणवत्ता आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. ‘येरे येरे पैसा 3’ हा एक परिपूर्ण मनोरंजनपट असून आम्ही याचा भाग झाल्याचा आनंद आहे.”

धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे चित्रपटाचे निर्माते असून सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. कलाकारांच्या यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. ‘येरे येरे पैसा 3’चे एनर्जेटिक टायटल साँग पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button