Breaking-newsमुंबई
अंधेरीच्या कामगार रुग्णालयाला आग, एकाचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Fire-1.jpg)
मुंबईतल्या अंधेरी भागात असलेल्या कामगार रूग्णालयात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे आठ बंब दाखल झाले आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग नेमकी का लागली ते अद्याप समजू शकलेले नाही. रुग्णालयात काहीजण अडकल्याची भीतीही व्यक्त होते आहे.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत आहेत. रूग्णालयातल्या रूग्णांना बाहेर काढण्याचे कामही सुरु आहे. अंधेरी पूर्व भागात असलेल्या एमआयडीसीत हे रूग्णालय आहे. नेमकी आग का लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून रूग्णांना बाहेर काढण्यात येते आहे. रूग्णालयाच्या वरच्या मजल्यांना ही आग लागली आहे. या परिसरात धुराचे लोट उठल्याचे पाहायला मिळते आहे.