“राज्यस्तरीय कॅडेट व युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी कु. तनिष्का हरिचंद्र शिंदे हिची निवड”

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
एच व्ही देसाई महाविद्यालय पुणे येथे झालेल्या पुणे वेटलिफ्टिंग संघटना आयोजित जिल्हास्तरीय कॅडेट व युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील कु. तनिष्का हरिचंद्र शिंदे इयत्ता बारावी वाणिज्य हिने अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात 57 किलोग्रॅम वजन गटात 131 किलोग्रॅम वजन उचलून प्रथम क्रमांक मिळविला त्यामुळे दि. 20 व 22 नोव्हेंबर 2026 सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅडेट व युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झालेली आहे यापूर्वी देखील तीने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. या खेळाडूला कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी प्रशिक्षक विजय पाटील सर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
हेही वाचा – धर्मवीर कबड्डी प्रीमियर लीगच्या निवड चाचणीला दमदार प्रतिसाद!

या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री अजित भाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव श्री सुधीर मुंगसे सर,पिं.चिं. मनपाचे नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रांत दादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.




