TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

बारामती विमानतळाच्या विकासासाठी १३२ कोटींचा निधी मंजूर; धावपट्टीसह पायाभूत सुविधांचे होणार आधुनिकीकरण

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; विमानतळाचे सुशोभीकरण, ऑपरेशनल विकास आणि सुरक्षिततेवर भर

बारामती : बारामती विमानतळाच्या विकासासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, विमानतळाच्या कामकाजासाठी आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी १३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्य सचिवांच्या समितीने या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीतून विमानतळाचे आधुनिकीकरण, सुशोभीकरण आणि ऑपरेशनल सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित विमान अपघाताच्या घटनेनंतर बारामती विमानतळावरील धावपट्टी आणि इतर सुविधांच्या स्थितीबाबत चर्चा सुरू झाली होती. विमानतळावरील काही सुविधा आधुनिक निकषांनुसार अद्ययावत करण्याची गरज असल्याचेही या पार्श्वभूमीवर अधोरेखित झाले होते.

या पार्श्वभूमीवर विमानतळाची धावपट्टी, आवश्यक यंत्रणा आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांमुळे विमानतळावरील सुविधा अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा –  पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी सर्व मैदाने मोफत उपलब्ध होणार; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा

एमएमआरडीसीकडून विमानतळाचे हस्तांतरण

गेल्या ३० डिसेंबर रोजी बारामती विमानतळाचे एमएमआरडीसीकडून हस्तांतरण करण्यात आले होते. त्यानंतर विमानतळाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

मंजूर निधीचा वापर विमानतळाच्या विकासकामांसाठी आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केला जाणार आहे. या निधीतून कोणती कामे कोणत्या टप्प्यात पूर्ण केली जाणार, याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रशासकीय प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group