Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कांदिवली स्थानकात AK-47 घेऊन पाकिस्तानी दहशतवादी आल्याचा AI व्हिडीओ बनावट; अज्ञात व्यक्तींविरोधात FIR

CCTV तपासणीत संशयास्पद व्यक्ती आढळली नाही; AI तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडीओ तयार केल्याचे स्पष्ट, सायबर पोलिसांकडून मूळ अकाउंटचा शोध सुरू

मुंबई : कांदिवली रेल्वे स्थानकात AK-47 घेऊन पाकिस्तानी दहशतवादी फिरत असल्याचा दावा करणारा पाच सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात FIR दाखल केला आहे. तांत्रिक तपासणीत हा व्हिडीओ AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी बोरीवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सायबर पोलिसांकडून व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तीचा आणि तो प्रसारित करणाऱ्या मूळ अकाउंटचा शोध घेतला जात आहे.

१६ नोव्हेंबर रोजी हा व्हिडीओ व्हॉट्सॲपवरून रेल्वे पोलिसांनाही पाठवण्यात आला होता. व्हिडीओमध्ये कांदिवली रेल्वे स्थानकात एक व्यक्ती AK-47 घेऊन फिरत असल्याचे दाखवण्यात आले होते. संबंधित व्यक्ती पाकिस्तानी दहशतवादी असल्याचा दावा करण्यात आल्याने रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल (RPF) सतर्क झाले होते.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे स्थानकावरील दिवसभराचे CCTV फुटेज तपासण्यात आले. तसेच स्थानक परिसराची पाहणी करण्यात आली. मात्र, तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा घटना आढळली नाही. तांत्रिक तपासणीत व्हिडीओ AI च्या मदतीने तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बोरीवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात FIR दाखल केला.

मुंबईत AI च्या माध्यमातून तयार केलेले बनावट व्हिडीओ व्हायरल होण्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. गेटवे ऑफ इंडिया येथे त्सुनामी आल्याचा, फिल्म सिटीला आग लागल्याचा, कुर्ला मॉलमध्ये बिबट्या दिसल्याचा, मुंबई हार्बरमध्ये महाकाय मगर आल्याचा तसेच फ्लायओव्हर कोसळल्याचा दावा करणारे व्हिडीओही सोशल मीडियावर प्रसारित झाले होते. AI ॲपच्या मदतीने काही मिनिटांत वास्तवदर्शी भासणारे व्हिडीओ तयार करता येत असल्याने अशा बनावट दृश्यांबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

हेही वाचा –  दुष्काळात शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नका; रविकांत तुपकरांचा मायक्रोफायनान्स कंपन्यांना इशारा

कांदिवलीत १५ वर्षांपासून रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाला गती

दरम्यान, कांदिवली पश्चिम येथे रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी २७ बांधकामे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर दक्षिण विभागाने निष्कासित केली आहेत. ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत मथुरादास मार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन परिसरात मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

या परिसरातील सुमारे ११० मीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणात ही बांधकामे मागील १५ वर्षांपासून अडथळा ठरत होती. ती हटवण्यात आल्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषतः कांदिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या कारवाईसाठी चार जेसीबी, ४० कामगार आणि १० अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच वायुप्रदूषण नियंत्रणविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी धूळ नियंत्रणाच्या उद्देशाने मिस्ट मशिन्सचा वापर करण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group