Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

कॅप्टन कूल MS धोनीचा IPL ला अलविदा; आता मेंटॉरची नवी भूमिका!

MS Dhoni IPL Retirement | भारतीय क्रिकेटचा आणि आयपीएलचा (IPL) सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने खेळाडू म्हणून आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. ज्या धोनीला मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी करताना पाहण्यासाठी कोट्यवधी चाहते आतुर असायचे, तो ‘कॅप्टन कूल’ आता मैदानावर फलंदाजी करताना दिसणार नाही. चेन्नई सुपर किंग्स (CSK) फ्रँचायझीने अधिकृत घोषणा करत धोनीचा खेळाडू म्हणून प्रवास संपल्याचे जाहीर केले असून, त्याच्याकडे आता संघाच्या ‘मेंटॉर’पदाची (मार्गदर्शक) मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आपल्या शांत डोक्याने आणि अचूक रणनीतीने चेन्नई सुपर किंग्सला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीच्या कारकिर्दीचा हा नवा अध्याय सुरू झाला आहे. मैदानाबाहेरून डगआऊटमधून तो आता चेन्नईच्या संघाला मार्गदर्शन करताना आणि रणनीती आखताना दिसणार आहे.

हेही वाचा

१२ वर्षांखालील मुलांना आता एकट्याने लिफ्ट किंवा एस्कलेटर वापरण्यास मनाई! राज्य सरकारचे नवे सुरक्षा नियम लागू

सीएसकेची भावनिक पोस्ट

चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट शेअर करत धोनीच्या नव्या भूमिकेची माहिती दिली. फ्रँचायझीने म्हटले की, “धोनीसारखा खेळाडू पुन्हा होणे शक्य नाही. त्याची भूमिका नवी असली तरी संघाबरोबरचे त्याचे नाते कायमचे आहे. असंख्य विजय, कठीण प्रसंग आणि अविस्मरणीय आठवणींच्या प्रवासात धोनी सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्सच्या केंद्रस्थानी राहिला आहे.”

पुढे सीएसकेने असेही नमूद केले की, “संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यापासून ते आता नव्या पिढीतील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यापर्यंत धोनीची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. ‘थाला’ नेहमीच चेन्नई सुपर किंग्सच्या ओळखीचा अविभाज्य भाग असेल आणि चेन्नई हे कायमच त्याचे घर राहील.” या घोषणेनंतर धोनीचा मैदानावरील वावर संपल्याची हळहळ चाहत्यांमध्ये असली, तरी तो संघासोबतच राहणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group