TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंढरपूर तालुक्यात विहीर खोदताना मातीचा ढिगारा कोसळला; चार मजूर अडकल्याची भीती

आंबे गावातील शेतात दुर्घटना; जेसीबीच्या मदतीने माती हटवण्याचे काम सुरू, प्रशासनाकडून बचावकार्य

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहीर खोदण्याचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली चार मजूर अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

निवास शिंदे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी अचानक मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने चार मजूर त्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा –  गडचिरोलीच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; ‘जिल्ह्याला विकसित करणार’

अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जेसीबीच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, बचावकार्य सुरू असताना अद्याप कोणत्याही मजुराला बाहेर काढण्यात आलेले नव्हते.

या दुर्घटनेतील मजुरांची स्थिती आणि बचावकार्याचा पुढील तपशील अद्याप समोर आलेला नाही. प्रशासनाकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group