TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

‘दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि भाऊबीज’; सुप्रिया सुळे अजितदादांच्या आठवणीत भावूक

भाऊबीजेच्या दिवशी जुन्या दिवाळीच्या आठवणींचा व्हिडीओ शेअर; ‘आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणं कठीण’ म्हणत व्यक्त केल्या भावना

पुणे : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच दिवाळी असल्याने पवार कुटुंबीयांनी यंदा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने एकत्र येणारे पवार कुटुंबीय यंदा मात्र वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, भाऊबीजेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. यासोबतच त्यांनी जुन्या दिवाळीतील आनंदी कौटुंबिक क्षणांचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.

‘दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज’

भाऊबीजेच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना सुप्रिया सुळे यांनी लिहिले, “दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली.”

जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी पुढे म्हटले, “आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात!”

हेही वाचा –  पुणे शहराचे नाव ‘फुले नगर’ करा; राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘तू आमच्या मनात कायम आहेस’

अजित पवार यांच्या अनुपस्थितीची भावना व्यक्त करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील.”

जुन्या दिवाळीच्या आठवणींचा व्हिडीओ शेअर

सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पवार कुटुंबातील दिवाळी आणि भाऊबीजेच्या जुन्या आठवणी पाहायला मिळत आहेत. कुटुंबातील सदस्यांचे एकत्रित आनंदाचे क्षण या व्हिडीओतून समोर आले आहेत. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत असून, कार्यकर्ते आणि नागरिकांकडूनही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group