ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आरकेएल गॅलेक्सी स्कूलमध्ये दिवाळीचा दणदणीत सोहळा

चिमुकल्यांच्या हातांनी सजले वर्ग आणि मजले!​ग्राउंडवर इयत्ता १ ली आणि २ रीच्या विद्यार्थ्यांनी साकारली दिव्याची भव्य मानवी आकृती; आकर्षक रचनेने वेधले सर्वांचे लक्ष

पिंपरी चिंचवड: आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल, वडमुखवाडी येथे ५ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला. या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही कृत्रिम सजावट न वापरता, संपूर्ण सजावट विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या हातांनी (Handmade) केली होती.

​कार्यक्रमाचे आयोजन नर्सरी ते २ आणि ३ ते १० अशा तीन गटांमध्ये करण्यात आले होते. या गटांमधील विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गांची आणि मजल्यांची अत्यंत आकर्षक सजावट करत संपूर्ण परिसर दिवाळीमय करून सोडला.

​ मानवी ‘दिवा’ ठरला मुख्य आकर्षण

या संपूर्ण महोत्सवातील सर्वात लक्षवेधी क्षण ठरला तो म्हणजे, शाळेच्या मैदानावर इयत्ता १ ली आणि २ रीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेला दिव्याचा भव्य आकार (Diya Formation). चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने एकत्र येत दिव्याची मानवी आकृती तयार केली. या अनोख्या कल्पनेने उपस्थित सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा –  जनसेवेच्या नव्या पर्वाला प्रारंभ! डॉ. सुहास कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

​ सर्जनशीलता आणि टीमवर्कचे दर्शन

दिवाळी सेलिब्रेशनमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले सुंदर आकाशकंदील, पानांची तोरणे, पारंपरिक रांगोळ्या आणि विविध आकर्षक कलाकृतींद्वारे शाळा सजवली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील कलागुण, टीमवर्क, सर्जनशीलता आणि एकतेचे सुंदर दर्शन घडले.

​हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री. जोतिबा सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समन्वयक आणि शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व उत्साहाने शाळेतील दिवाळी साजरीकरणाची ही बातमी संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

​”आम्ही केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला (Creativity) आणि उपजत कलागुनांना प्रोत्साहन देण्यावर नेहमीच प्राधान्य देतो. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी केलेली वर्गसजावट आणि चिमुकल्यांनी मैदानावर साकारलेली दिव्याची मानवी आकृती हे त्यांच्यातील एकात्मता, सांघिक भावना (Teamwork) आणि कल्पकतेचे उत्तम उदाहरण आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये भारतीय संस्कृतीची गोडी निर्माण होण्यासोबतच आत्मविश्वास वाढीस लागतो. दिवाळी उत्सवाच्या या सुंदर सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.”

– डॉ. पुष्कर चोबे, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) 
आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group