Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

“संपूर्ण देश उद्ध्वस्त करायचा नाही, पण गरज पडल्यास…”; ट्रम्प यांचा इराणला इशारा

Donald Trump | अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला थेट लष्करी कारवाईचा इशारा दिला असून, “अमेरिकेच्या मंजुरीशिवाय तेहरान आपल्या अणु कार्यक्रमात पुढे जाऊ शकत नाही,” असा दावा केला आहे. ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी इराणला निर्वाणीचा इशारा देत, “मला संपूर्ण इराण उद्ध्वस्त करायचा नाही, पण गरज पडल्यास मला ते करावं लागेल; तुम्हाला लवकरच समजेल,” असे सूचक विधान केले.

गेल्या आठ महिन्यांपासून इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने छेडलेल्या इराण युद्धाचे तीव्र राजकीय पडसाद दोन्ही देशांच्या अंतर्गत राजकारणावर उमटले आहेत; ज्यामध्ये एका बाजूला युद्धावरून निर्माण झालेली नाराजी मतदारांच्या रोषाचे कारण ठरल्याने अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवरील नियंत्रण गमावून डेमोक्रॅट्सने सत्तांतर घडवून आणले आहे, तर दुसऱ्या बाजूला इस्रायलमध्ये राजकीय भूकंप होऊन अरबांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांनी यशर पक्षाचे नेते गाडी आयसेनकोट यांना पाठिंबा दिल्यामुळे आणि ‘युनायटेड तोराह ज्युडाइझम’ने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुढील पंतप्रधानांचा शपथविधी होईपर्यंत पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू पदावर राहणार असले, तरी त्यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे.

हेही वाचा

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

तेहरानवर मोठ्या प्रमाणावर हल्ल्यांची टांगती तलवार

तेहरानने वॉशिंग्टनला मान्य असलेल्या अटींवर करारास सहमती दर्शवली नाही, तर निवडणुकीनंतर इराणवर पुन्हा मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्याची धमकी ट्रम्प यांनी यापूर्वीच दिली होती. आता मध्यावधी निवडणुका पार पडल्यानंतर ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group