Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; प्रसिध कृष्णा दुखापतीमुळे बाहेर

IND vs NZ | टी-२० मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध रंगणाऱ्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज आकिब नबीचा आता पहिल्या तीन सामन्यांच्या संघातही समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियाद्वारे या बदलाची अधिकृत माहिती दिली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान प्रसिध कृष्णाच्या पायाचे स्नायू दुखावले (हॅमस्ट्रिंग) होते. न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याची निवड फिटनेस चाचणीच्या अधीन राहून करण्यात आली होती. मात्र, तो या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरू शकलेला नाही. वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानंतर त्याला मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.

हेही वाचा

पिंपरी-चिंचवडमधील सोसायट्यांचे ११ प्रमुख प्रश्न आयुक्तांच्या दालनात; ३४ संस्थांचे निवेदन सादर!

बीसीसीआयने या ५ सामन्यांच्या मालिकेसाठी दोन वेगवेगळ्या टप्प्यांत संघांची घोषणा केली होती. सुरुवातीला आकिब नबीची निवड केवळ चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी करण्यात आली होती. मात्र, प्रसिध कृष्णा बाहेर झाल्यामुळे आता आकिब नबी सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांसह पाचही सामन्यांसाठी भारतीय संघाचा भाग असणार आहे. याशिवाय, अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी फक्त पहिल्या वनडे सामन्यात खेळणार असून, त्यानंतर तो आगामी कसोटी मालिकेच्या पूर्वतयारीसाठी सराव शिबिरात दाखल होणार आहे.

पहिल्या ३ वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, आकिब नबी.

चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), ईशान किशन (उपकर्णधार व यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, ऋतुराज गायकवाड, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, यश ठाकूर, गुरनूर ब्रार, आकिब नबी.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button