Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

टाटा समूहावरून राहुल गांधी-निर्मला सीतारमण यांच्यात जुंपली; अमित शाहांच्या घरी बैठक का झाली? राहुल गांधींचा थेट सवाल

नवी दिल्ली | टाटा समूहाला जाणीवपूर्वक उद्ध्वस्त केले जात असल्याच्या आरोपावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यात जोरदार वाक्युद्ध पेटले आहे. अर्थमंत्र्यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळत त्यांना “सर्वत्र भुतं पाहणं थांबवा” असा टोला लगावला होता. यावर राहुल गांधींनी तात्काळ पलटवार करत, टाटा ट्रस्ट्स आणि टाटा सन्सच्या प्रतिनिधींना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बोलावण्याचे नेमके कारण काय, असा थेट सवाल उपस्थित करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर पोस्ट करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. “केंद्र सरकारकडून टाटा समूहाला पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू असून, उद्योजक भीतीपोटी गप्प बसले आहेत,” असा दावा त्यांनी केला होता.

राहुल गांधींच्या या आरोपांचा समाचार घेताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांना खडे बोल सुनावले. सीतारमण म्हणाल्या की, “राहुल गांधींनी प्रत्येक मुद्द्याचे राजकारण करणे थांबवावे आणि सामान्य व्यावसायिक बाबींना विनाकारण गुन्हेगारी स्वरूप देऊ नये. भारतीय उद्योगजगताला पाठबळ देणे, शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि तरुणांचे भविष्य घडवणे ही सरकार, राजकीय पक्ष आणि संस्थांची सामायिक जबाबदारी आहे.” निराधार आरोप करण्याऐवजी विधायक चर्चा करण्याचा सल्ला देत शेवटी अर्थमंत्र्यांनी, “राहुलजी, सर्वत्र भुतं पाहणं थांबवा,” असा खोचक टोमणाही लगावला.

हेही वाचा

WPL 2027 मिनी लिलाव संपन्न; लिलावानंतर असे आहेत पाचही फ्रँचायझींचे संपूर्ण संघ

राहुल गांधींचे अर्थमंत्र्यांना दोन नवे प्रश्न

निर्मला सीतारमण यांच्या टीकेनंतर राहुल गांधी यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले. त्यांनी अर्थमंत्र्यांना उद्देशून ‘डिअर मिसेस सीतारमण’ असे म्हणत दोन प्रश्न उपस्थित केले.

“टाटा ट्रस्ट्स आणि टाटा सन्सच्या प्रतिनिधींना अमित शाह यांच्या निवासस्थानी बोलावण्याची गरज कोणत्या ‘कायदेशीर आणि व्यावसायिक’ बाबीमुळे निर्माण झाली?” असा पहिला प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. तसेच, “क्रोनी क्रमांक एक या प्रकरणात कधी प्रवेश करणार आणि टाटा समूहाचे कोणते भाग त्याच्या ताब्यात जाणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

देशातील तीन-चार उद्योगपती वगळता इतर सर्व भारतीय उद्योगपती सरकारवर नाराज असल्याचा दावा करत, त्यांना कोणाकडूनही चिथावणी देण्याची गरज नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button