Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

WPL 2027 मिनी लिलाव संपन्न; लिलावानंतर असे आहेत पाचही फ्रँचायझींचे संपूर्ण संघ

WPL 2027 | महिला प्रीमियर लीग २०२७ (WPL 2027) हंगामासाठीचा बहुप्रतिक्षित ‘मिनी लिलाव’ केरळमधील कोची येथे पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियन कर्णधार सोफी मॉलिन्यूक्सवर सर्वाधिक १.१ कोटी रुपयांची बोली लागली. तिला संघात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि यूपी वॉरियर्स यांच्यात चुरस रंगली होती; मात्र अखेर यूपी वॉरियर्सने बाजी मारली. दुसरीकडे, भारताची स्फोटक फलंदाज किरण नवगिरेवर दिल्ली कॅपिटल्सने ७५ लाखांची यशस्वी बोली लावून आपल्या ताफ्यात सामील केले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी १.१५ कोटींच्या पर्ससह मैदानात उतरली होती. संघाने तेजल हसबनिस आणि जेस जॉन्सन या दोघींना आपल्या संघात स्थान दिले.

पूर्ण संघ: स्मृती मानधना (कर्णधार), जॉर्जिया वॉल, तेजल हसबनिस, ऋचा घोष, प्रत्युषा कुमार, वृंदा दिनेश, श्रेयांका पाटील, सायली सातघरे, प्रेमा रावत, नादिने डी क्लार्क, एलिस पेरी, जेस जॉन्सन, क्लो ट्रायॉन, राधा यादव, पूजा वस्त्राकर, लॉरेन बेल, अरुंधती रेड्डी.

यूपी वॉरियर्स

यूपी वॉरियर्सने सोफी मॉलिन्यूक्ससाठी १.१ कोटींची सर्वाधिक बोली लावली, तर ग्रेस हॅरिस आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी ३० लाखांच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात घेतले.

पूर्ण संघ: प्रतिका रावल, फिबी लिचफील्ड, मेग लॅनिंग, हरलीन देओल, सिमरन शेख, सुष्मा वर्मा, क्षिप्रा गिरी, ग्रेस हॅरिस, स्नेह राणा, सोफी मॉलिन्यूक्स, दीप्ती शर्मा, कॅथरीन ब्राइस, सहाना पवार, मनाली दक्षिणी, शिखा पांडे, क्रांती गौड, सोफी एक्लेस्टन, आशा शोभना.

हेही वाचा

पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीचा वापर करू नये; प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

गुजरात जायंट्स

गुजरात जायंट्सने मोठ्या नावांवर खर्च न करता युवा खेळाडूंवर भर दिला. संघाने जी. कमलिनी (४० लाख) आणि ओरला पेंडरग्रस्ट यांना संघात समाविष्ट केले.

पूर्ण संघ: जी कमलिनी, भारती फुलमली, यस्तिका भाटिया, बेथ मूनी, ओरला पेंडरग्रस्ट, सोफी डिव्हाइन, किम गार्थ, कनिका अहूजा, जॉर्जिया वेअरहॅम, ॲश्ले गार्डनर, अनुष्का शर्मा, समायरा राघव, तनुजा कंवर, रेणुका सिंग ठाकूर, राजेश्वरी गायकवाड, काश्वी गौतम, जिंतमणी कलिता, हॅप्पी कुमारी.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सने आक्रमक फलंदाज किरण नवगिरेवर सर्वाधिक ७५ लाखांची बोली लावून आपली फलंदाजी अधिक बळकट केली.

पूर्ण संघ: किरण नवगिरे, निकी प्रसाद, लॉरा वूलवार्ट, जेमिमा रॉड्रिग्स, दिया यादव, ममता मदीवला, शफाली वर्मा, मॅरीझन कॅप, लुसी हॅमिल्टन, शेनली हेन्री, ॲनाबेल सदरलँड, काश्वी कंडीकुप्पा, नजमा खान, नंदिनी शर्मा, श्री चरणी, मिन्नू मणी, क्रिस्टी गॉर्डन.

मुंबई इंडियन्स

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला मोजक्याच खेळाडूंची गरज असल्याने त्यांनी प्रत्येकी १० लाखांच्या मूळ किमतीत तीन खेळाडूंचा समावेश केला.

पूर्ण संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), दिशा कसात, सनिका चालके, श्वेता सेहरावत, लतिका इनामदार, राहिला फिरदौस, संजीवन संजना, निकोला कॅरी, नॅट सिव्हर ब्रंट, हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, अमनजोत कौर, अक्षिता भगत, भारती रावल, तारा नॉरिस, वैष्णवी शर्मा, शबनिम इस्माइल, संस्कृती गुप्ता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button