संस्थापकांचा समृद्ध वारसा आणि कर्मचाऱ्यांचे समर्पण; आय आय बी एम समूह संचलित शाळा-महाविद्यालयांचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

पिंपरी-चिंचवड | वर्णेकर युनिव्हर्सल फाउंडेशन, आयआयबीएम कॉलेज (IIBM), कॅम्ब्रिज स्कूल, चॅम्प्स स्कूल आणि जेट इंडिया या शिक्षण संस्थांच्या स्थापनदिनानिमित्त ‘फाउंडर्स डे २०२६’ गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर २०२६) अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
संस्थेच्या प्रगतीमध्ये अविरत योगदान देणाऱ्या व दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या प्रसंगी विशेष ‘लॉयल्टी अवॉर्ड’ (Loyalty Awards) देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर आणि नगरसेविका सौ. शीतल वर्णेकर, अभिषेक वर्णेकर, यश वर्णेकर, संचालक राम रैना यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी बोलताना अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. “कुठल्याही शिक्षण संस्थेचा कणा हे तिचे निष्ठावंत शिक्षक आणि कर्मचारी असतात. आज संस्था ज्या उंचीवर पोहोचली आहे, त्यात या सर्वांचा मोलाचा वाटा आहे,” असे उद्गार त्यांनी काढले.
हेही वाचा
प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे विद्यार्थ्यांकडून ई-कचरा संकलन मोहीम
‘आय आय बी एम कॉलेज चिखली संस्थेतील लॉयल्टी अवॉर्ड’ विजेते:
संस्थेशी एकनिष्ठ राहून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खालील कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले:
श्री. अमोल भागवत
श्री. राजेश पेडणेकर
श्री. पांडुरंग मंचरे
कु. प्रतिक्षा डफळ
श्री. अनिकेत वंजारी
सौ. एकता सिंग
सौ. अनिता जवंजळ
श्री. सचिन बरबडे
श्री. मिलिंद उशिर
तसेच संपूर्ण संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला वर्णेकर युनिव्हर्सल फाउंडेशन मधील सर्व संस्थेचे महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख (HOD), शिक्षकवृंद आणि प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेलिब्रिटी अँकर ओंकारेश्वरी व आभारप्रदर्शन करून सोहळ्याची सांगता झाली.




