बॅंक खात्याची गोपनिय माहिती विचारून वृध्द महिलेला घातला गंडा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/crime-akola_201807102638.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आधार लिंक करण्यासाठी मोबाईलद्वारे खोटे बोलून बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून एका ज्येष्ठ महिलेच्या बॅंक खात्यातून 39 हजार 940 रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना कस्पटेवस्ती वाकड येथे घडली.
अरुंधती तारानाथ जेरे (वय 74, रा. निसर्ग सृष्टी अपार्टमेंट, कस्पटेवस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधारकार्ड बॅंक खात्याला लिंक करायचा आहे, असे अरुंधती जेरे यांना कॉल करून सांगितले. कोठून बोलताय म्हटल्यानंतर स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या केशवापूर शाखेतून बोलत असल्याचे पलिकडून सांगितले. एटीएम कार्डची गोपनिय माहिती विचारण्यात आली. अरुंधती यांनी सर्व माहिती दिल्यानंतर त्यांच्या खात्यातून 39 हजार 940 रुपये काढून घेतल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.