Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

टंचाईग्रस्त भागातील पिकांची पालकमंत्री संजय शिरसाटांकडून पाहणी; पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद; ‘शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे’

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी वैजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाचा दौरा करून पिकस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी जांबरगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आमदार रमेश बोरनारे यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट यांनी मौजे जांबरगाव, ता. वैजापूर येथे टंचाईच्या पार्श्वभूमीवर भेट देऊन शेतातील पिकांची पाहणी केली. यावेळी तहसीलदार सुनील सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी तसेच स्थानिक अधिकारी उपस्थित होते.

पिकांची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्या आणि परिस्थितीबाबत त्यांची मते जाणून घेतली. पिकांची झालेली स्थिती पाहून त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा –  गणेशोत्सवातून समाजप्रबोधनाची परंपरा अधिक व्यापक करा; गणेश मंडळांना पालकमंत्री जयकुमार रावल यांचे आवाहन

टंचाईमुळे पिकांचे नुकसान झालेल्या भागातील पिकांचे पंचनामे तातडीने करावेत, असे निर्देश पालकमंत्री शिरसाट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

टंचाईग्रस्त भागातील परिस्थितीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणींची नोंद घ्यावी आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देशित केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button