Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अमरावती दौरा; नागरिकांसाठी ‘जनसंवाद’ कार्यक्रम

दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत नियोजन भवनात नागरिकांच्या समस्या, मागण्या आणि तक्रारींची निवेदने स्वीकारणार

अमरावती : महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवार, २१ सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या आणि मागण्या जाणून घेण्यासाठी ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे होणार आहे. या कालावधीत पालकमंत्री बावनकुळे नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत.

हेही वाचा –  टंचाईग्रस्त भागातील पिकांची पालकमंत्री संजय शिरसाटांकडून पाहणी; पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

जनसंवाद कार्यक्रमादरम्यान नागरिकांना त्यांच्या विविध समस्या, मागण्या आणि तक्रारींबाबतची लेखी निवेदने थेट पालकमंत्र्यांकडे सादर करता येणार आहेत. नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन संबंधित बाबींवर प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान, नागरिकांनी या जनसंवाद कार्यक्रमाची नोंद घेऊन आपल्या समस्या व मागण्या मांडण्यासाठी २१ सप्टेंबर रोजी नियोजन भवन येथे उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button