TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

गरबा- दांडियावरून वाद; अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘सण सर्वसमावेशक असायला हवा’

विहिंपच्या मुस्लिम प्रवेशबंदीच्या मागणीला वेगळा सूर; भाजपकडून सावध भूमिका, नितेश राणेंचीही मवाळ भूमिका

मुंबई : नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेशबंदी करण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गरबा उत्सव सर्वसमावेशक असावा, अशी भूमिका मांडली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे या मुद्द्यावर सत्ताधारी गोटात वेगवेगळे सूर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विहिंपने गरबा आणि दांडिया आयोजकांना मुस्लिमांना प्रवेश न देण्याचे आवाहन केले आहे. सहभागींची ओळखपत्रांद्वारे पडताळणी करण्यासह हिंदू ओळख निश्चित करण्यासाठी टिळा लावण्याची सूचनाही करण्यात आली आहे. मंत्री नितेश राणे यांनी यापूर्वी विहिंपच्या भूमिकेला समर्थन दर्शविले होते.

मात्र, अमृता फडणवीस यांनी याबाबत वेगळी भूमिका मांडली. एखादी मुस्लिम व्यक्ती शांततेत गरब्याचा आनंद घेऊन जात असेल, तर त्यात गैर काही वाटत नाही, असे त्यांनी म्हटले. गरबा हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होणारा सांस्कृतिक उत्सव बनला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  धर्मादाय ट्रस्टच्या शाळांमध्ये RTE अंमलबजावणीवर आता थेट नियंत्रण; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

विहिंपचा प्रवेशबंदीच्या भूमिकेचा पुनरुच्चार

अमृता फडणवीस यांच्या भूमिकेनंतर विहिंपने मात्र आपली भूमिका कायम ठेवली आहे. नवरात्र हा हिंदू धार्मिक उत्सव असल्याने मुस्लिमांनी त्यात सहभागी होण्याचे कारण काय, असा सवाल विहिंपकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, नितेश राणे यांनीही काहीशी मवाळ भूमिका घेत मुस्लिमांनी गरब्यात सहभागी व्हायचे असल्यास शुद्ध हेतूने यावे, असे म्हटले. त्याचवेळी ‘लव्ह जिहाद’ला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून सावध भूमिका

या वादापासून भाजपने अंतर राखण्याचा प्रयत्न केला आहे. विहिंप ही भाजपपेक्षा वेगळी संघटना असून मुस्लिमांवर बंदी घालण्याचे कोणतेही आवाहन भाजपने केलेले नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गरबा-दांडिया कार्यक्रमांमध्ये कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याला प्राधान्य असल्याचेही भाजपकडून सांगण्यात आले.

काँग्रेसकडून नितेश राणेंवर निशाणा

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अमृता फडणवीस यांच्या सर्वसमावेशक भूमिकेचे स्वागत केले. मात्र, मुस्लिम समाजाविरोधात वारंवार वक्तव्ये करणाऱ्या नितेश राणे यांच्यावर कारवाई करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला आहे.

या संपूर्ण वादामुळे नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच गरबा-दांडिया कार्यक्रमांतील प्रवेश, सुरक्षा आणि सर्वसमावेशकतेचा मुद्दा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group