TOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला; कुठे पाहता येणार सामना? जाणून घ्या सर्व माहिती

५ सप्टेंबरला दुबईत रंगणार हायव्होल्टेज सामना; रात्री ८ वाजता सुरू होणार लढत, भारताचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड मजबूत

Women’s Asia Cup 2026 : वुमन्स आशिया कप २०२६ स्पर्धेचा थरार सुरू असून भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. भारताने थायलंड आणि हाँगकाँगचा पराभव करत स्पर्धेत आपली पकड मजबूत केली आहे. दुसरीकडे, पाकिस्ताननेही आपला पहिला सामना जिंकत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.

साखळी फेरीतील भारताचा अखेरचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारतासाठी या सामन्याच्या निकालाचा उपांत्य फेरीच्या दृष्टीने फारसा परिणाम होणार नसला, तरी पाकिस्तानसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारताविरुद्ध पराभव झाल्यास पाकिस्तानला पुढील समीकरणांसाठी इतर निकालांवर अवलंबून राहावे लागू शकते. त्यामुळे या हायव्होल्टेज सामन्याची उत्सुकता वाढली आहे.

भारत-पाकिस्तान सामना कधी?

भारत आणि पाकिस्तान महिला संघांमधील वुमन्स आशिया कप २०२६ मधील सामना ५ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना रात्री ८ वाजता सुरू होईल. त्यापूर्वी सायंकाळी ७.३० वाजता नाणेफेक होईल.

हेही वाचा –  शताब्दी वर्षात मोहन भागवत यांचा लंडन दौरा; ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश जगभर पोहोचवणार

सामना कुठे होणार?

भारत-पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळवला जाणार आहे.

सामना कुठे पाहता येणार?

या सामन्याचे थेट प्रक्षेपण Sony Sports Network वर पाहता येणार आहे.

कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?

भारत-पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग SonyLIV अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

भारत-पाकिस्तान हेड टू हेड

भारत आणि पाकिस्तान महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १७ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताचा वरचष्मा राहिला आहे. भारताने १४ सामन्यांत विजय मिळवला असून पाकिस्तानला केवळ ३ सामने जिंकता आले आहेत.

भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), जी. कमलिनी (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, प्रेमा रावत, राधा यादव, श्री चरणी, रेणुका ठाकूर, नंदनी शर्मा, क्रांती गौड आणि प्रतिका रावल.

पाकिस्तान संघ

फातिमा सना (कर्णधार), आयेशा जफर, इमान नसीर, आयमान फातिमा, गुल फिरोजा, मोमिना रियासत, मुनीबा अली सिद्दीकी (विकेटकीपर), नशरा सुंधू, सदफ शमास, सादिया इक्बाल, सायरा जबीन, शवाल झुल्फिकार, तुबा हसन, उम्म-ए-हानी आणि वहीद अख्तर.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group