Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचा भडका! दक्षिण इराणवर अमेरिकेचा भीषण हवाई हल्ला

US Iran Conflict | पश्चिम आशियामध्ये जुलै महिन्यापासून असलेली तात्पुरती शांतता मंगळवारी रात्री पुन्हा एकदा भंग पावली आहे. अमेरिकेने दक्षिण इराणमधील अनेक ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले चढवले आहेत. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही जॉर्डन, बहारिन, कुवेत आणि इराकमधील अमेरिकी लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणने केलेल्या कारवायांनंतर प्रत्युत्तर म्हणून इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’वर हे हल्ले चढवल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेने केलेल्या या भीषण हल्ल्यांत किमान १२ जण ठार झाल्याची माहिती इराणच्या प्रशासनाने दिली आहे. यामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील सिरिक कौंटीमध्ये सुरू असलेल्या एका विवाह सोहळ्यावर झालेल्या हल्ल्याचा समावेश असून, त्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेने इराणवर आणखी हल्ले करण्याचा इशारा दिल्याने या भागातील तणाव शिगेला पोहोचला आहे.

हेही वाचा

महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला नवी दिशा; गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाला मोठी चालना

अमेरिकेच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, रडार यंत्रणा, सागरी मालमत्ता, सुरुंग पेरण्याची क्षमता आणि दूरसंचार केंद्रांवर अचूक हल्ले करण्यात आले. यानंतर इराणनेही होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील अनेक अमेरिकी लक्ष्यांवर प्रतिहल्ले केले. या संघर्षाचे थेट पडसाद आशियाई आणि युरोपीय शेअर बाजारांवर उमटले असून बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत.

जुलैनंतरचा सर्वात मोठा संघर्ष

अमेरिकेने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण इराणवर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बॉम्बवर्षाव केला होता. त्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले अचानक थांबवून शांतता चर्चेसाठी मार्ग मोकळा केला होता. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचलेली ही चर्चा निष्फळ ठरली असून, अमेरिकेने पुन्हा थेट कारवाई सुरू केल्याने संपूर्ण आखातात युद्धाचे सावट गडद झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button