Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार भरारी! पहिल्या तिमाहीत जीडीपी वृद्धीदर ७.८ टक्के

India Q1 GDP Growth Rate | मध्यपूर्वेतील संघर्ष, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भडकलेले दर आणि पुरवठा साखळीतील अडथळे यांसारख्या मोठ्या आव्हानांना न जुमानता भारतीय अर्थव्यवस्थेने चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (२०२६-२७) पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) देशाचा ढोबळ राष्ट्रीय उत्पादन (GDP) वृद्धीदर ७.८ टक्के नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) वर्तवलेल्या ७ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा ही आकडेवारी अधिक ठरली आहे.

इराण-अमेरिका तणावामुळे जागतिक बाजारात वाढलेले इंधनाचे दर आणि देशांतर्गत वाढलेली महागाई यामुळे आर्थिक गती मंदावेल, असा अंदाज आरबीआयसह अनेक अर्थतज्ज्ञांनी वर्तवला होता. आरबीआयने ५ ऑगस्टच्या पतधोरण आढाव्यात पहिल्या तिमाहीसाठी ७ टक्के वाढीचा अंदाज बांधला होता. मात्र, जाहीर झालेल्या आकडेवारीने हा अंदाज चुकीचा ठरवला आहे. एप्रिल-जून कालावधीतील ७.८ टक्के हा दर जानेवारी-मार्च तिमाहीतील ८.६ टक्क्यांपेक्षा कमी असला, तरी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील (२०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीतील ६.९ टक्के) वाढीच्या तुलनेत यात मोठी सुधारणा दिसून आली आहे.

हेही वाचा

नूतन अभियांत्रिकी महाविद्यालय आणि रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पॉक्सो/पॉश कायदा २०१३’ कार्यशाळा संपन्न

पुढील तिमाहींमध्ये विकासदर मंदावण्याची शक्यता

आरबीआयचा अंदाज चुकवत पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी केल्यानंतर अनेक अर्थतज्ज्ञ आता संपूर्ण वर्षासाठी विकासदर अंदाज वाढवत आहेत. असे असले तरी, आगामी काळात वाढीचा वेग काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे. आरबीआयच्या अंदाजानुसार, आगामी तिमाहींमध्ये दुसरी तिमाही (जुलै-सप्टेंबर) ६.४ टक्के, तिसरी तिमाही (ऑक्टोबर-डिसेंबर) ६.५ टक्के, चौथी तिमाही (जानेवारी-मार्च २०२७) ६.८ टक्के आणि पुढील वर्षाची पहिली तिमाही (एप्रिल-जून २०२७) ७.३ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. आरबीआयने संपूर्ण २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एकूण जीडीपी वृद्धीदर ६.७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

जीडीपी आणि आर्थिक विकास दर म्हणजे काय?

जीडीपी (GDP) म्हणजे एका वर्षात देशाच्या सीमेमध्ये उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांचे एकूण बाजारमूल्य, तर आर्थिक विकास दर म्हणजे या उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत झालेली टक्केवारीतील वाढ किंवा घट होय. मागील तिमाही किंवा वार्षिक कालावधीच्या तुलनेत चालू काळात जीडीपी किती टक्क्यांनी वाढला किंवा कमी झाला, याचे प्रमाण म्हणजे आर्थिक विकास दर होय. यावरुन देशाची अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जात आहे, याचा अंदाज येतो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group