Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर हल्ला; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

नांदेड | शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारात प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. गुरुद्वारात दर्शन घेत असताना एका निहंगाने तलवारीने त्यांच्यावर वार केले. या हल्ल्यात बादल यांच्या हाताला आणि खांद्याला दुखापत झाली असून त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

सुखबीर सिंग बादल हे आपल्या पत्नी व खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह नांदेड साहिब गुरुद्वारात आले होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिथे उपस्थित असलेल्या चार निहंगांपैकी एकाने अचानक तलवारीने बादल यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी बादल यांच्या सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत हल्लेखोराला बाजूला ढकलले आणि मोठा अनर्थ टाळला. घटनेनंतर पोलिसांनी तत्परता दाखवत संबंधित हल्लेखोर निहंगाला तात्काळ ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा

चाकणच्या उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १६ ऑगस्टला बैठक; उद्योगमंत्री उदय सामंत

सुखबीर बादल यांच्यावर यापूर्वीही झाला होता हल्ला

सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुद्वारा परिसरात हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात धार्मिक शिक्षेचा भाग म्हणून सेवादार म्हणून सेवा देत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. आता नांदेडच्या पवित्र भूमीत घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि शिख समुदायात मोठी खळबळ उडाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button