Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे विभागात भेसळयुक्त व प्रतिबंधित अन्नसाठ्यावर कारवाई; ८.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे | अन्न व औषध प्रशासनाच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पुणे विभागात १४ जुलै रोजी विविध ठिकाणी कारवाई करून भेसळीच्या संशयावरून रु. ८ लाख ३३ हजार ३९१ किमतीचा अन्नसाठा तसेच रु. २२ हजार ७८९ किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

सांगली जिल्ह्यात दूध भेसळ प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुण्यातील मार्केट यार्डातील एका आस्थापनातून हळद पावडर, तीळ व सोयाबीन चंकचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

हेही वाचा

NEET फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; १७ विद्यार्थ्यांना ७०० हून अधिक गुण

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनास पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीसही देण्यात आली आहे.

ग्राहकांनी अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा स्वच्छतेबाबत तक्रारी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर नोंदवाव्यात, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या सह आयुक्त (अन्न), पुणे विभाग यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button