ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

एस.टी. महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त वल्लभनगर एस.टी. स्थानकात वृक्षारोपण; महापौर रवि लांडगे यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पिंपरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त वल्लभनगर एस.टी. स्थानक प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, हरित विकास आणि वृक्षसंवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

यावेळी महापौर रवि लांडगे यांनी वृक्षारोपण करून उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. ते म्हणाले, “आज लावलेले प्रत्येक झाड हे उद्याच्या पिढीसाठी दिलेली अमूल्य भेट आहे. वाढते शहरीकरण आणि बदलते हवामान लक्षात घेता वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला, तर हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्याचे आपले स्वप्न निश्चितच साकार होईल.”

हेही वाचा –  बारामती रेल्वे स्थानकाच्या कायापालटाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांचे आभार

तसेच त्यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. वृक्ष लागवड ही केवळ औपचारिकता न राहता त्यांचे संगोपन आणि संवर्धनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील, स्थानक प्रमुख वैशाली कांबळे, कार्यशाळा प्रमुख राजगुरू, वाहतूक निरीक्षक कुलकर्णी, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे सचिव राजन जांभळे, अनंत तायडे तसेच एस.टी. महामंडळाचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

एस.टी. महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करत प्रत्येकाने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश देण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button