१०० कोटींची कमाई करणारा समांथा रुथ प्रभूचा ‘मा इंटी बंगारम’ ओटीटीवर होणार रिलीज, कुठे पाहायचा? वाचा…

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘मा इंटी बंगारम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये ती मुख्य भूमिकेत असून तिच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली तर तेलुगू भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा स्त्री-केंद्रीत चित्रपट ठरला. अशातच आता समांथाचा हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
बी. व्ही. नंदिनी रेड्डी दिग्दर्शित ‘मा इंटी बंगारम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ज्यांनी सिनेमागृहात जाऊन पाहिला नाही त्यांना ओटीटीवर पाहता येणार आहे. हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे जाणून घेऊयात…
ओटीटीवर कधी व कुठे रिलीज होणार
समांथाची प्रमुख भूमिका असलेला ‘मा इंटी बंगारम’ (Maa Inti Bangaaram) हा चित्रपट १७ जुलै २०२६ पासून जिओहॉटस्टारवर रिलीज होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा जिओहॉटस्टार आणि समांथा रुथ प्रभूच्या चित्रपटाच्या निर्मिती संस्थेने केली आहे. सध्या हा चित्रपट फक्त तेलुगू भाषेत ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन
चित्रपटाने केली १०० कोटींची कमाई
‘मा इंटी बंगारम’ची दिग्दर्शिका बी. व्ही. नंदिनी रेड्डी यांनी केलं असून. या चित्रपटाची कथा समांथाचे पती राज निदिमोरू यांची आहे. पटकथा वसंत मारिंगंती आणि राज निदिमोरू यांनी लिहिली आहे. चित्रपटाला संतोष नारायणन यांनी संगीत दिलं आहे. समांथाच्या या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटाला यश मिळाल्यानतंर तिच्या नवऱ्ये तिला ही आनंदाची बातमी दिली. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिचा आनंदा व्यक्त केला.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राज निदिमोरू समांथाला विचारतो, “तुला काही खास पाहायचं आहे का?” यावर सामंथा होकार देते. त्यानंतर राज तिच्या हातात आयपॅड देतो. सामंथा आयपॅड अनलॉक करताच चित्रपटाच्या जगभरातील बॉक्स ऑफिस कमाईचा आकडा तिच्यासमोर दिसतो. बेबी बंप फ्लॉन्ट करत असलेली सामंथा हा आकडा पाहून आनंदाने हसते आणि म्हणते, “आपण १०० कोटींची कमाई केली.” चित्रपटाच्या यशाची बातमी पाहून ती किती आनंदी आणि भावूक झाली होती, हे या व्हिडीओमधून स्पष्ट दिसून येते.





