Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘धमाल 4’चा बॉक्स ऑफिसवर धडाका! ‘राजा शिवाजी’, ‘अल्फा’सह 10 चित्रपटांचे विक्रम मोडले

Dhamaal 4 Box Office Collection: अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘धमाल 4’ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादासह समीक्षकांनीही चित्रपटाचे कौतुक केल्याने त्याचा थेट परिणाम कमाईवर दिसून आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने दमदार कमाई करत 2026 मधील अनेक चित्रपटांचे ओपनिंग डे रेकॉर्ड मागे टाकले आहेत.

पहिल्याच दिवशी दमदार कमाई

प्रदर्शनापूर्वीच ‘धमाल 4’ला अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटासाठी सुमारे 1.08 लाखांहून अधिक तिकिटांची आगाऊ बुकिंग झाली होती. ब्लॉक बुकिंगसह चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधूनच 6.11 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यानंतर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी रात्रीपर्यंत चित्रपटाने 13.75 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा –  देशातील सर्वात मोठ्या ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन सेंटरच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

10 चित्रपटांचे विक्रम मोडले

‘धमाल 4’ने पहिल्याच दिवशीच्या कमाईत 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. यामध्ये ‘राजा शिवाजी’ (हिंदी), ‘अल्फा’, ‘पेद्दी’, ‘ओ रोमियो’, ‘मर्दानी 3’, ‘है जवानी तो इश्क होना है’, ‘इक्कीस’, ‘चांद मेरा दिल’, ‘पति पत्नी और वो 2’ आणि ‘हॉन्टेड 3डी’ या चित्रपटांचा समावेश आहे.

स्वतःच्या फ्रँचायझीचेही विक्रम मागे

‘धमाल 4’ने केवळ इतर चित्रपटांनाच नाही, तर स्वतःच्या फ्रँचायझीतील आधीच्या दोन भागांनाही कमाईत मागे टाकले आहे. पहिल्या ‘धमाल’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 2.38 कोटी रुपये, तर ‘डबल धमाल’ने 7.60 कोटी रुपये कमावले होते. ‘धमाल 4’ने या दोन्ही चित्रपटांच्या ओपनिंग डे कमाईचा विक्रम सहज मोडला आहे. मात्र, ‘टोटल धमाल’ने पहिल्या दिवशी 16.50 कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे हा विक्रम मोडण्यासाठी ‘धमाल 4’ला अजून काही अंतर पार करावे लागणार आहे.

स्टारकास्टही तगडी

‘धमाल 4’ हा लोकप्रिय ‘धमाल’ फ्रँचायझीचा चौथा भाग आहे. या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, जावेद जाफरी, संजय मिश्रा, रवि किशन, संजिदा शेख आणि ईशा गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात एका जुन्या खजिन्याच्या शोधात सुरू होणारी धमाल, गोंधळ आणि विनोदी प्रसंगांची रेलचेल दाखवण्यात आली असून, प्रेक्षकांकडून या कॉमेडीपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button