Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

लोणावळा- कर्जत घाटातील रेल्वे विस्कळीत; १७ जुलैपर्यंत अनेक गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले

पुणे | लोणावळा-कर्जत घाट विभागात ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दुरुस्त करण्यात आलेल्या एका मार्गावरूनच सध्या रेल्वे वाहतूक सुरू असून उर्वरित मार्गिका पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने ११ ते १७ जुलै या कालावधीत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यासह काही रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले की, दरड हटविणे, रुळांची दुरुस्ती आणि सुरक्षितता तपासणीचे काम सुरू असल्याने पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यास आणखी काही दिवस लागू शकतात. अचानक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे प्रवाशांना नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने १७ जुलैपर्यंतचा बदललेले वेळापत्रक जाहीर केले आहे.

वळविण्यात आलेल्या रेल्वेगाड्या

मध्य रेल्वेने विविध मार्गांवरून एकूण ३० हून अधिक एक्स्प्रेस वळविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम, मदुरई-एलटीटी, कराईकल-एलटीटी, एमजीआर चेन्नई-अहमदाबाद, सिकंदराबाद-राजकोट, पुणे-संतरागाछी, अहमदाबाद-एमजीआर चेन्नई, राजकोट-कोइम्बतूर, पोरबंदर-सिकंदराबाद, अजमेर-सोलापूर या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. या गाड्या दौंड-मनमाड-इगतपुरी-कल्याण, दौंड-मनमाड-जळगाव-सुरत; तसेच इतर पर्यायी मार्गांवरून चालविण्यात येणार आहेत.

हेही वाचा

इराणवर अमेरिकेचे भीषण हवाई हल्ले; संतप्त इराणने होर्मुझची सामुद्रधुनी केली बंद!

पुणे येथे अंशत: रद्द होणाऱ्या रेल्वेगाड्या

होस्पेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस
सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस

खडकी येथे अंशत: रद्द होणाऱ्या रेल्वेगाड्या

केएसआर बेंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस
कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
शॉर्ट ओरिजिनेटेड होणाऱ्या रेल्वेगाड्या

पुणे येथून शॉर्ट ओरिजिनेटेड होणाऱ्या रेल्वेगाड्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर एक्स्प्रेस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – केएसआर बेंगळुरू एक्स्प्रेस

खडकी येथून शॉर्ट ओरिजिनेटेड होणाऱ्या रेल्वेगाड्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सोलापूर एक्स्प्रेस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – होस्पेट एक्स्प्रेस

रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. संबंधित सर्व पथके अहोरात्र कार्यरत आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. रेल्वेगाड्यांच्या चालण्याबाबतच्या माहितीसाठी, प्रवासी रेल्वे मदतवाहिनीशी संपर्क साधू शकतात, अशी माहिती मध्य रेल्वेद्वारे देण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button