Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

५ वर्षांनंतर हॉरर विश्वात पुनरागमन! इमरान हाशमीचा ‘रूह’ कधी रिलीज होतोय?

Emraan Hashmi returns : हॉरर चित्रपटात तब्बल ५ वर्षानंतर इमरान हाशमी पुनरागमन करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा लोकप्रिय अभिनेता पाच वर्षांनंतर ‘रूह’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘रूह’ हा केवळ एक भयपट नाहीये. तर आधुनिक हॉरर, म्युझिक आणि उत्तम कथानक यांचा संगम आहे. मोठ्या पडद्यावरील कथानकाचे सादरीकरण लक्षात घेऊन तो तयार करण्यात आलाय. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘ब्रीद’ फ्रँचायझीसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक मयंक शर्मा करत आहेत.

चित्रपटाची कथा आणि पटकथा मयंक शर्मा आणि ‘लपाछपी’ व ‘छोरी’सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे विशाल कपूर यांनी लिहिली आहे. तर विक्रम खाखर आणि सनी खन्ना यांच्या विक्ड फिल्म्स प्रॉडक्शन्सतर्फे चित्रपटाची निर्मिती होत आहे.

हेही वाचा –  ‘जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर विकास कामांच्या गुणवत्तेवर भर द्या तसेच iPAS प्रणालीचा १०० टक्के वापर करावा’; पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

नवा चित्रपट ‘रूह’ची घोषणा झाल्यानंतर निर्मात्यांनी त्याचा पहिला लूक देखील जारी केला आहे. यामध्ये ही देखील माहिती देण्यात आली आहे की, चित्रपट कधी रिलीज होईल.

५२ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये जंगलात एक रहस्यमय तरुणी दिसते. त्यानंतर एक अस्पष्ट आरसा दिसतो, ज्याला एक रहस्यमय हात स्वच्छ करतो. आरशात इम्रान हाश्मीचा चेहरा दिसतो. त्याचे डोळे गडद होतात आणि त्यानंतर चित्रपटाचे टायटल ‘रुह’ दाखवले जाते.

निर्मात्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, हा चित्रपट २०२७ मध्ये रिलीज होईल. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु सारख्या भाषांमध्ये रिलीज होईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button