ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवित

खाशाबांना पद्मविभूषण व मला शिवछत्रपती पुरस्‍कार मिळावा – बंडा पाटील

कोल्‍हापूर | ऑलिम्‍पिक दिनानिमित्त ध्रुवतारा फाऊंडेशनकडून दिला जाणारा मानाचा चौथा खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील यांचा गौरव करण्यात करण्यात आला. देशाचे भूषण खाशाबा जाधव यांना पदम्‌विभूषण तर मला शिवछत्रपती पुरस्‍कार मिळाला पाहिजे अशी अपेक्षा बंडा पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

कोल्‍हापूरातील ऐतिहासिक जिल्‍हा परिषद संचालित मेन राजाराम हायस्कूल सभागृहात क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांच्‍या हस्‍ते बंडा पाटील यांना शाल, श्रीफळ, सन्‍मानचिन्‍ह व रोख हजार रूपयांने सन्‍मान करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक मनिष झंवर, रोहित मुसळे, क्रीडा अधिकारी अरूण पाटील, प्राचार्य गजानन खाडे, लेखक संजय दुधाणे , वस्‍ताद बाबा महाडिक, शहाजी सूर्यवंशी आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. राष्ट्रीय खो-खो खेळाडू सानिका चाफे, अमृता पाटील, श्रावणी पाटील, कुस्‍तीगीर पृथ्वीराज मोहिते, क्रीडा प्रशिक्षक भीमा भांदिगरे यांचाही या विशेष सत्‍कार करण्यात आला.

कोल्‍हापूरातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूलमध्ये १९५२ काळात राजाराम महाविद्यालय भरायचे. या महाविद्यालाच्‍या मुख्य सभागृहात खाशाबांचा कोल्‍हापरकरांनी नागरी सत्‍कार केला होता. याच ऐतिहासिक सभागृहात खाशाबा जाधव पुरस्‍कार समारंभ ऑलिम्‍पिक दिनीच्‍या निमित्ताने रंगला. यावेळी कोल्‍हापूरातील खाशाबांच्‍या आठवणींना उजाळा संजय दुधाणे देत नव्‍या पिढीतही खाशाबा घडावा अशी अपेक्षा टाळ्यांच्‍या गजरात व्‍यक्‍त केली.

हेही वाचा

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय! मुंबईत संततधार, पुण्यात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट!

सत्‍काराला उत्तर देताना बंडा पाटील म्‍हणाले की आमचे आदर्श खाशाबांना नावाने मला पुरस्‍कार मिळाला हे माझे परमभाग्य आहे. मलाही ऑलिम्‍पिकपटू असताना शासनाने शिवछत्रपती पुरस्‍कार अजून दिला नाही. तो मिळावी हीच अपेक्षा आहे. क्रीडा उपसंचालक सुहास पाटील आपल्‍या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, कोल्‍हापूरातील खेळाडूंना अत्‍याधुनिक सुविधा देण्यासाठी आम्‍ही कटिबध्द आहे. खाशाबांप्रमाणे अनेक क्रीडापटू घडण्यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी आहे.

क्रीडा क्षेत्रातील जेष्ठ व निवोदित चार पिढींच्‍या उपस्‍थितीत खाशाबा जाधव पुरस्कार स्‍मरणीय झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुषमा पाटील यांनी केले तर आभार आरोग्यसेवक राजेंद्र मकोटे यांनी मानले.

सभागृहाला खाशाबांचे नाव देण्याचा प्रस्‍ताव

मेन राजाराम हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्‍या सभागृहाला खाशाबा जाधव यांचे नाव देण्याचा प्रस्‍ताव जिल्‍हा परिषद सदस्या वर्षाराणी अरूण पाटील यांनी सादर केला आहे. मंगळवारी होणाऱ्या जिल्‍हा परिषदसर्वसाधारण बैठकीत हा प्रस्‍ताव मांडण्यात येणार आहे. मेन राजाराम हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्‍या सभागृहात खाशाबा जाधव यांचे तैलचित्र हे लेखक संजय दुधाणे भेट देणार असून त्‍याचे अनाकरण केले जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button