Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयक्रिडा

१८ वर्षीय लामिन यामालचा फिफा वर्ल्डकपमध्ये धमाका! लिओनेल मेस्सीचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडीत

Lamine Yamal | फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत स्पेनने सौदी अरेबियावर ४-० असा दणदणीत विजय मिळवून आपल्या मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. या सामन्यात स्पेनच्या १८ वर्षीय लामिन यामालने पुन्हा एकदा आपल्या अफाट कौशल्याने संपूर्ण फुटबॉल विश्वाचे लक्ष वेधून घेतले. यामालने सामन्यातील पहिला गोल करत स्पेनचे खाते उघडले आणि याच गोलसोबत त्याने महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा एक ऐतिहासिक विश्वविक्रम मोडीत काढला.

पहिल्या सामन्यातील बरोबरीनंतर स्पेनने या सामन्यात सुरुवातीपासूनच सौदी अरेबियावर हल्लाबोल केला होता. मध्यांतरापर्यंतच स्पेनने ३-० अशी मजबूत आघाडी घेत आपला विजय जवळपास निश्चित केला होता.

लामिन यामालने या गोलसह बार्सिलोनाचा माजी स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचा विक्रम मोडीत काढला आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात गोल करणाऱ्या सर्वात युवा खेळाडूंच्या यादीत यामालने आता मेस्सीला मागे टाकले आहे.

यामालने वयाच्या अवघ्या १८ वर्षे आणि ३४३ व्या दिवशी हा गोल केला. यापूर्वी मेस्सीने वयाच्या १८ वर्षे आणि ३५७ व्या दिवशी आपला पहिला वर्ल्डकप गोल केला होता. मेस्सीला मागे टाकत यामाल आता वर्ल्डकप इतिहासात गोल करणारा आठवा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

हेही वाचा

ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! मिलिंद नार्वेकरांचा भास्कर जाधवांना खोचक टोला

महान पेले यांच्या विक्रमाच्या जवळ

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सलामीचा गोल करणारा लामिन यामाल हा १८ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचा जगातील दुसराच खेळाडू ठरला आहे. या यादीत अव्वल स्थानी ब्राझीलचे महान दिवंगत खेळाडू पेले आहेत. पेले यांनी १९५८ मधील वर्ल्डकपमध्ये वेल्सविरुद्ध वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी पहिला गोल डागला होता.

स्पेनचा ४-० ने एकतर्फी विजय

सामन्यात लामिन यामालने सुरुवातीलाच गोल करून स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मिकेल ओयार्झाबाने उत्कृष्ट खेळ करत आणखी दोन गोल डागले. त्यामुळे पहिल्या हाफमध्येच स्पेन ३-० ने पुढे होता. मध्यांतरानंतर स्पेनच्या संघाने आणखी एक गोल करत सौदी अरेबियाचा ४-० असा धुव्वा उडवला.

फिफा वर्ल्डकप इतिहासात गोल करणारे सर्वात युवा खेळाडू:

  • पेले – १७ वर्षे, २३९ दिवस
  • मॅन्युएल रोसास – १८ वर्षे, ९३ दिवस
  • गावी – १८ वर्षे, ११० दिवस
  • इब्राहिम म्बाये – १८ वर्षे, १४२ दिवस
  • मायकल ओवेन – १८ वर्षे, १९० दिवस
  • निकोलाय कोवाक्स – १८ वर्षे, १९७ दिवस
  • दिमित्री सिचेव्ह – १८ वर्षे, २३१ दिवस
  • लॅमिन यामाल – १८ वर्षे, ३४३ दिवस
  • लिओनेल मेस्सी – १८ वर्षे, ३५७ दिवस
  • ज्युलियन ग्रीन – १९ वर्षे, २५ दिवस

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button