Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

आधार कार्डबाबत ही एक चूक तर झाली नाहीना? अन्यथा सरकारी योजना बंद होणार

Aadhaar Card Update: आधार कार्ड हा सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे. लहान मुलांच्या शाळेपासून ते सिम कार्ड घेण्यापर्यंतच्या सर्व कामांमध्ये आधार कार्डाचा वापर केला जातो. यामध्ये तुम्हाला आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबर ओटीपी पाठवला जातो. तोच ओटीपी तुम्हाला तुमच्या सर्व कामांसाठी महत्वाचा असतो. पण तुमच्या मोबाईल नंबरमध्ये काही चूक झाली असेल किंवा चुकीचा नंबर आधारशी जोडलेला असेल तर तुम्हाला त्यामध्ये वेळीच दुरुस्ती करावी लागू शकते.

तुमचाही आधार कार्डशी जोडलेला नंबर चुकीचा असेल तर तुम्ही आताच त्यामध्ये बदल करा. कारण सरकारी कामांमध्ये आधार कार्ड खूप महत्वाचा पुरावा मानला जातो. त्यात जर काही चुका असतील तर तुमची कामं अपूर्णच राहतील. तसेच सध्या डिजिटल कामांमध्ये आधार कार्डशी लिंक असलेल्या नंबरवरच ओटीपी दिला जातो. त्यात अचडणी न याव्यात यासाठी तुम्ही पुढील प्रोसेस फॉलो करू शकता.

हेही वाचा –  रोहितचा रेकॉर्ड, विराटच्या जागी कोणाला संधी? वाचा अफगाणिस्ताविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11

बऱ्याचदा तुमचा मोबाईल नंबर चुकीचा असला तर दुसऱ्या व्यक्तीला तुमचा OTP जातो. त्यामुळे तुमची सर्व माहिती इतरांपर्यंत पोहोचते. याने खातंही रिकामं होऊ शकतं. चला पुढील माहितीत आपण आधार कार्डाचा मोबाईल नंबर बदलण्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊयात.

तुम्हाला आधार कार्डावरील महत्वाचे घरच्या घरी करता येत नाहीत. त्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावं लागतं. UIDAI ने हा नियमच आहे. आधार केंद्रावर जाऊन तुम्हाला एक आधार अपडेट फॉर्म जमा करावा लागतो. ही अगदी सोपी आहे. तुम्हाला यामध्ये कोणताही पुरावा सादर करावा लागत नाही. तुम्ही फॉर्ममध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक लिहाला हवा. तुम्हाला यासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागतात. मग ९० दिवसांच्या आत तुम्हाला अपडेट झालेला एसएमएस पाठवला जातो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button