प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे रेबीज जनजागृती सत्राचे आयोजन

पिंपरी | प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे विद्यार्थी व पालकांसाठी रेबीज जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. हे सत्र मिशन रेबीजचे प्रशिक्षक श्री. आबिद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. सत्रामध्ये रेबीज हा आजार कसा पसरतो, त्याची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच प्राणी चावल्यास तात्काळ कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच भटक्या कुत्र्यांशी सुरक्षितपणे कसे वागावे याचेही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी व पालकांनी उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
हेही वाचा
या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये रेबीजबाबत जागरूकता निर्माण झाली तसेच आरोग्य व सुरक्षिततेसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. शाळेच्या प्राचार्या श्रीमती आशा रेड्डी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा जनजागृती कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या वतीने मिशन रेबीजचे प्रशिक्षक श्री. आबिद यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.





