वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधाराला डच्चू… मुंबई इंडियन्सचे दिग्गज ‘त्रिकूट’ संघाबाहेर; नवा कर्णधार नवी टीम

India T20 Team Selection 2026 Squad Announcement : बीसीसीआयच्या निवडसमितीने आगामी आयर्लंडविरूद्धच्या टी २० मालिकेसह इंग्लंड आणि एशियन गेम्ससाठी देखील आपल्या टी २० संघाची घोषणा केली आहे. काही महिन्यापूर्वीच झालेल्या टी २० वर्ल्डकप विजेत्या संघातील अनेक खेळाडूंना या संघात स्थान दिलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेप्रमाणे आऊट ऑफ फॉर्म सूर्यकुमारला डच्चू देण्यात आला असून त्याला कर्णधारपद आणि संघातील स्थान देखील गमवावं लागलं आहे. विशेष म्हणजे या संघात मुंबई इंडियन्सचे तीनही दिग्गज खेळाडू नाहीयेत.
निवडसमितीने अपेक्षेप्रमाणे आयपीएलचे अनेक सीजन आपल्या कॅप्टन्सीने गाजवणाऱ्या श्रेयस अय्यरच्या गळ्यात टीम इंडियाच्या कर्णधारपदाची माळ पडली आहे. विशेष म्हणजे तरूण खेळाडू तिलक वर्माला उपकर्णधार करून निवडसमितीने मोठा संदेश दिला आहे.
आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी २० मालिकेत मुंबई इंडियन्सचे तीन दिग्गज खेळाडू सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह खेळणार नाहीयेत. सूर्यकुमारला डच्चू मिळाला आहे तर हार्दिक आणि जसप्रीत बुमराह मालिकेसाठी उपलब्ध नाहीयेत. जरी तो आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी उपलब्ध नसला तरी त्याची निवड एशियन गेम्ससाठीच्या भारतीय संघात करण्यात आली आहे.





