Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

सूर्यकुमार यादवला मोठा धक्का! टी-२० संघाच्या कर्णधारपदासह भारतीय संघातून पत्ता कट

Suryakumar Yadav | भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक वृत्त समोर येत आहे. भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याची माहिती आहे. आयपीएल २०२६ मधील खराब कामगिरी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने खालावत चाललेल्या फॉर्ममुळे बीसीसीआयने (BCCI) हा अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, सूर्याला केवळ कर्णधारपदावरूनच नाही, तर थेट भारतीय संघातूनही वगळण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सूर्यकुमार यादवला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. टी-२० विश्वचषकातील एक-दोन खेळी आणि आयपीएल २०२६ मधील अखेरच्या सामन्यातील अर्धशतक सोडल्यास, त्याची बॅट शांतच राहिली आहे. आयपीएलनंतर सध्या सुरू असलेल्या मुंबई टी-२० लीगमध्येही सूर्याचा फ्लॉप शो कायम राहिला. निवड समिती आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर हे सूर्याला आगामी इंग्लंड दौऱ्यापर्यंत संधी देण्यास अनुकूल होते, परंतु भविष्यातील संघ उभारणीचा विचार करून व्यवस्थापनाने तातडीने हा मोठा निर्णय घेतल्याचे समजते.

हेही वाचा

प्रतिबंधित पान मसाला, गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थाचा १ कोटी ५८ लाख २८ हजार रुपयांचा साठा जप्त

श्रेयस अय्यर कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे

सूर्यकुमार यादवच्या गच्छंतीनंतर आता भारताचा पुढील टी-२० कर्णधार कोण असणार, यावर चर्चा सुरू झाली आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, या शर्यतीत मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा सर्वात आघाडीवर आहे. ‘आयएएनएस’च्या वृत्तानुसार, संघात चौथ्या क्रमांकाची जागा रिक्त असून श्रेयस त्या जागेसाठी आणि कर्णधारपदासाठी अगदी योग्य पर्याय मानला जात आहे. संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्या नावांचीही चर्चा असली, तरी श्रेयस अय्यरचे पारडे जड आहे.

तिलक वर्माकडे उपकर्णधारपद? अक्षर पटेलची सुट्टी होणार

कर्णधारपदासोबतच उपकर्णधारपदातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. निवड समितीने तरुण फलंदाज तिलक वर्माच्या नावावर सखोल चर्चा केली असून, त्याला टी-२० संघाचे उपकर्णधारपद दिले जाऊ शकते. दुसरीकडे, अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला आपले उपकर्णधारपद गमवावे लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आयपीएलनंतर होणाऱ्या एकदिवसीय तिरंगी मालिकेत तिलक वर्मा भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार आहे, ज्यामुळे त्याच्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button