ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

पीसीयुची औद्योगिक विद्यापीठाच्या दिशेने वाटचाल : कुलपती हर्षवर्धन पाटील

शिक्षण विश्व: पीसीयू कोसमे पुणे बेस कॅम्प करार, एक मैलाचा दगड

पिंपरी- चिंचवड | भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या मध्ये आर्थिक, औद्योगिक संबंध आणखी मजबूत आणि वृद्धिंगत होण्यासाठी पीसीयू आणि कोसमे यांच्या मध्ये झालेला सामंजस्य करार हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतामध्ये कोरियातील लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करण्यामध्ये कोसमे ची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पीसीयू मध्ये कोसमे पुणे बेस कॅम्प हे देशातील एकमेव आहे. याचा उपयोग कोरियन भाषा प्रशिक्षण, प्राध्यापक देवाणघेवाण कार्यक्रम, विद्यार्थी कौशल्य विकास, संशोधन, स्टार्टअप इनक्युबेशन, कोरियन एसएमइ साठी उत्पादन चाचणी सुविधा आणि उद्योग शैक्षणिक सहकार्य असे विविध उपक्रम पीसीयू मध्ये सुरु करण्यासाठी होईल. यासाठी कोरियन सरकार देखील सकारात्मक आहे असे कोरिया प्रजासत्ताक महावाणिज्य दूत डोंगवान यू यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे कोरिया एसएमइ स्टार्टअप एजन्सी (कोसमे) यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिल्या “कोसमे पुणे बेस कॅम्प”चे उद्घाटन कोरिया प्रजासत्ताक महावाणिज्य दूत डोंगवान यू आणि पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, प्रादेशिक संचालक, विभागीय संचालक ईशान्य आशिया आणि एशियन कोसमे सुसोक पार्क, व्यवस्थापकीय संचालक कोसमे जीबीसी नवी दिल्ली जेक्यॉन्ग ली, मुख्य व्यापार प्रतिनिधी किटा योंग यून, संचालक सीईपीए नवी दिल्ली सेउंगचांग हा, कार्यकारी संचालक पीसीईटी डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू संतोष सोनवणे, स्टाराजीन कंपनीच्या सीईओ युजिन हान, पीसीयू अधिष्ठाता डॉ. रामदास बिरादार, कुलसचिव डॉ. अनिल माहेश्वरी तसेच कोरियन कंपन्यांचे अधिकारी, प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

पीसीयूमध्ये आयोजित ‘कोरिया बिझनेस कल्चर प्रोग्राम’ या सहा आठवड्यांच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचे सादरीकरण केले. यामध्ये विद्यार्थ्यांना कोरियन व्यावसायिक संस्कृती, कार्यपद्धती, उद्योग, अपेक्षा आणि जागतिक करिअरच्या संधींबाबत प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण देण्यात आले होते.

हेही वाचा

डॉ. आबाजी माने यांना राष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक!

प्रास्ताविक डॉ. रामदास बिरादार यांनी केले. सूत्र संचालन स्टाराजीन कंपनीच्या सीईओ युजिन हान यांनी केले. आभार डॉ. अनिल माहेश्वरी यांनी मानले.

उद्योग रोजगारासाठी चालना…

एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अधिकारी नितीन गवळी यांनी कोसमे पुणे बेस कॅम्पच्या स्थापनेमुळे महाराष्ट्र हे कोरियन गुंतवणूक आणि उद्योग विस्तार, रोजगारासाठी चालना मिळेल. एमआयडीसी या केंद्राशी संबंधित कोरियन कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले. सुसोक पार्क यांनी सांगितले की, पुणे हे ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी आणि नवोन्मेष क्षेत्रातील अग्रगण्य केंद्र म्हणून उदयास येत आहे. या माध्यमातून कोरियन उद्योगांना सक्षम करण्यासाठी आणि नवीन सहकार्याच्या संधी निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू असे सांगितले.

नव्या संधी निर्माण…

स्वागत करताना कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, पीसीयू मध्ये उद्योगाभिमुख शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्वांटम तंत्रज्ञान आणि इंडस्ट्री ४.० यांवर विशेष भर दिला जातो. कोसमे पुणे बेस कॅम्प हे कोरियन उद्योग आणि भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेमधील दुवा म्हणून कार्य करणार असून यामुळे उद्योग, रोजगार क्षेत्रासाठी नव्या संधींची दारे खुली होणार आहेत असे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले. स्टाराजीन कंपनीच्या सीईओ युजिन हान यांनी कोसमे आणि पीसीयू यांच्यातील सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या पहिल्या सामंजस्य करारापासून विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, एमआयडीसी सोबतचे संवाद, पुण्यातील कोरियन उद्योगांशी झालेल्या चर्चा आणि नवी दिल्ली येथे झालेला करार याची माहिती दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button