Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंबेनळी घाटात भीषण अपघात! स्कॉर्पिओ दरीत कोसळून साताऱ्यातील ८ तरुणांचा मृत्यू

Ambenali Ghat Accident | पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात सोमवारी पहाटे एक भीषण दुर्घटना घडली आहे. कोकणातून साताऱ्याकडे चाललेली एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन शेकडो फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात गाडीतील आठही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात सोमवारी मध्यरात्रीनंतर पहाटे सुमारे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.

अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडीचा क्रमांक एमएच ११ डीएन २३४० (MH 11 DN 2340) असा आहे. गाडीतील सर्व मृत हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी होते. या घटनेमुळे आसगाव परिसरासह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा

पंतप्रधान मोदींच्या बंगळूर दौऱ्यावेळी जिलेटिनच्या कांड्या आढळल्याप्रकरणी ६ पोलीस निलंबित

बचाव कार्यात दरी आणि अंधाराचे मोठे आव्हान

अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर रेस्क्यू टीम, भाटिया रेस्क्यू ग्रुप, प्रतापगड रेस्क्यू टीम, सिस्केप संस्था, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घाटातील अतिशय अवघड वळणे, खोल दरी आणि मध्यरात्रीचा मिट्ट अंधार यामुळे सुरुवातीला बचाव कार्यात प्रचंड अडचणी येत होत्या. मात्र, जीवाची पर्वा न करता सर्व बचाव यंत्रणांनी समन्वयाने काम करत शोधमोहीम राबवली आणि हे ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

अपघातातील मृतांची नावे:

या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये बहुतांश तरुण वयातील मुलांचा समावेश आहे. मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१. महेश अनिल पवार (वय २५)
२. आदित्य अशोक साळुंखे (वय २१)
३. रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५)
४. सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०)
५. अंश समीर चव्हाण (वय १८)
६. उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१)
७. अनिल अभिमन्यू शिंगटे (वय २५)
८. नितीन किसन नायकोंडे (वय ३५)

आंबेनळी घाटातील अपघातांची मालिका

आंबेनळी घाटात यापूर्वीही अनेक मोठे आणि जीवघेणे अपघात घडले आहेत. काही वर्षांपूर्वी एका विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळून मोठी जिवंतहानी झाली होती. या ताज्या दुर्घटनेमुळे घाटातील प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा अपघात चालकाचा ताबा सुटल्याने झाला की अन्य काही तांत्रिक कारणांमुळे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button