लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी! अपात्र महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी ईकेवायसी करणं अनिवार्य करण्यात आले होते. मात्र ज्या महिलांनी ईकेवायसी केले नाही अथवा चुकीचा केला आहे, त्यांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे. मात्र आता लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
केवायसी करताना योग्य कागदपत्र सादर करु न शकलेल्या महिलांसाठी एक संधी देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसीच्या दुरुस्तीची शेवटची तारीख ३० एप्रिल होती. मात्र ज्या महिलांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यांनी महिला व बालविकास कार्यालयात जाऊन कागदपत्र सादर करता येणार आहे.
हेही वाचा – आता AI सांगणार किती टॅक्स भरायचा? नवीन प्राप्तिकर कायद्यात घसबसल्या भरा ITR
या महिला आता जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागात जाऊन ही कागदपत्र सादर करु शकतात. यानंतर पडताळणी केली जाईल. त्यानंतर महिलांचा लाभ पुन्हा एकदा सुरु केला जाईल. मुदत संपल्यानंतर कागदपत्र सादर करण्यासाठी निर्णय घेतला आहे. एकही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नुकतेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 14 आणि 15 मे रोजी मार्च-एप्रिल या दोन महिन्याचा हप्ता देण्यात आला. एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आले. परंतु या योजनेतून निकषात न बसणाऱ्या जवळपास ६६ ते ७६ लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आले आहे. या पडताळणीने राज्य सरकारचे या योजनेवर खर्च होणाऱ्या कोटयावधी रुपयांची बचत झाली आहे.





