Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिक ‘टीसीएस’ प्रकरण: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अवैध घरावर महापालिकेचा ‘बुलडोझर’

छत्रपती संभाजीनगर | नाशिकमधील बहुचर्चित ‘टीसीएस’ धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मतीन पटेल यांचे नारेगाव येथील अनधिकृत निवासस्थान बुधवारी सकाळी महानगरपालिकेने ‘बुलडोझर’ लावून जमीनदोस्त केले.

महानगरपालिकेच्या पथकाने बुधवारी पहाटे सहा वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तात या कारवाईला सुरुवात केली. मतीन पटेल यांचे कार्यालय आणि दोन निवासस्थाने अवैध असल्याचे सांगत महापालिकेने यापूर्वीच त्यांना नोटीस बजावली होती. ही घरे अधिकृत असल्याचे सिद्ध करण्यासाठी पटेल यांना ७२ तासांची मुदत देण्यात आली होती. या नोटिसीच्या विरोधात पटेल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिल्याने महापालिकेने हे पाऊल उचलले.

हेही वाचा

बारामतीत पुन्हा विमान अपघात; प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याने खळबळ

निदा खानला लपविल्याचा आरोप

नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणात अटकेत असलेल्या निदा खान, तिची मावशी आणि बहीण यांना नारेगावमधील एका घरात लपवून ठेवण्यात मतीन पटेल यांनी मदत केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना सहआरोपी केले असून, तेव्हापासून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. ज्या घरात निदा खानला लपवण्यात आले होते, ते घर मतीन पटेल यांच्या नावावर नसल्याचेही प्राथमिक माहितीत समोर आले आहे.

कार्यकर्त्यांची अनोखी नाराजी

महापालिकेचे पथक कारवाईसाठी आले असता, तिथे उपस्थित असलेल्यांनी कारवाई करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांना हार घालून आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसल्याचा आधार घेत महापालिकेने मतीन पटेल यांचे घर पूर्णपणे पाडून टाकले आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि नारेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button