‘ऑपरेशन सिंदूर भारताने स्वतःच्या अटींवर थांबवलं’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे स्पष्ट विधान

नवी दिल्ली | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात करण्यात आलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ भारताने स्वेच्छेने आणि स्वतःच्या अटींवर थांबवल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. भारत दीर्घकालीन लढाईसाठी पूर्णपणे तयार होता आणि देशाची अतिरिक्त क्षमता आजही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीत आयोजित एएनआय सुरक्षा परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते होते. “पाकिस्तान सारखा देश सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालत आला आहे. पाकिस्तान आणि भारत एकाचवेळी स्वतंत्र झाले पण आज जगात भारताचा माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी मान सन्मान आहे. तशी पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे तळ म्हणून ओळख निर्माण झाली आहे”, असे म्हणत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. दहशतवाद नेहमीच सार्वजनिक शांतता, विकास आणि समृद्धीसाठी आव्हान देत राहिल, असे विचार सिंह यांनी मांडले.
हेही वाचा
वाकड-दत्त मंदिर रस्ता रुंदीकरण निधीची पळवला!
राजनाथ सिंह यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करताना पाकिस्तानविरोधातील कारवाई भारताने स्वेच्छेने आणि स्वतःच्या अटींवर थांबवल्याचे सांगितले. “या ऑपरेशनच्यावेळी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात उत्तम संवाद आणि योग्य नियोजन असल्याचे दर्शन घडले. ऑपरेशन सिंदूर ७२ तासांत समाप्त झाले असले तरी त्यामागे मोठी तयारी होती. भारतीने मोठी लढाई करण्याची तयारी केली होती. आपली क्षमता, शस्त्रसाठा, स्वदेशी शस्त्रांवरील विश्वास आमच्या प्रतिबंध धोरणाचा भाग झाले आहेत”, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे जगभरात भारताने निर्माण केलेल्या शस्त्रांवरील विश्वास वाढला असून, अनेक देशांकडून आता यासाठी मागणी केली जात आहे.





