Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे?

Food In Summer | सध्या उन्हाळ्याचा कडाका वाढत असून अंगाची लाही-लाही होत आहे. कडाक्याचे ऊन आणि वाढत्या उष्णतेमुळे अनेकांचा जीव कासावीस होत आहे. या दिवसात पाणी पिण्याचे प्रमाण वाढल्याने भूक मंदावते, परिणामी खाण्यापिण्याच्या सवयी बिघडून पचनशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे या असह्य उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि पचायला हलका असा ‘संतुलित आहार’ घेणे काळाची गरज बनली आहे.

उन्हाळ्यात ‘हे’ आवर्जून खावे:

  • उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि थंडावा मिळवण्यासाठी खालील पदार्थांचा आहारात समावेश करा:
  • ताजी फळे आणि ज्यूस: कलिंगड, संत्री, मोसंबी, द्राक्षे, अननस आणि सफरचंद यांसारखी हंगामी फळे खावीत किंवा त्यांचा ताजा रस प्यावा.
  • पारंपारिक पेये: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी लिंबू पाणी, ताक, शहाळे (नारळ पाणी), नाचणीची आंबील आणि कैरीचे पन्हे ही उत्तम पर्याय आहेत.
  • हलका आहार: आहारात हिरव्या पालेभाज्या, ज्वारी, नाचणी, कडधान्ये आणि वरण-भात यांसारख्या पचायला हलक्या पदार्थांना प्राधान्य द्यावे.
  • दुग्धजन्य पदार्थ: दूध, तूप आणि दही यांचा नियमित वापर करावा.
  • सॅलेडचा वापर: कांदा, काकडी, गाजर, पुदिना आणि कलिंगड यांचा समावेश असलेल्या ‘ग्रीन-रेड सॅलेड’चा वापर वाढवावा.

हेही वाचा 

पाकिस्तानात पेट्रोल साठा संपला; मंत्र्यांची धक्कादायक कबुली

उन्हाळ्यात ‘हे’ खाणे टाळावे:

  • उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून काही पदार्थांपासून दूर राहणेच हिताचे ठरते:
  • मसालेदार व तेलकट पदार्थ: अति तेलकट, तिखट आणि फास्टफूडमुळे पित्त, अपचन व गॅसचा त्रास होऊ शकतो. तसेच तळलेले पदार्थ, लोणचे आणि चटण्या टाळाव्यात.
  • शीतपेये व कॅफिन: बाहेरची कोल्ड्रिंक्स, अति थंड पाणी तसेच चहा आणि कॉफीचे सेवन शक्यतो टाळावे.
  • मांसाहार: मासे, अंडी आणि इतर मांसाहाराचे प्रमाण या दिवसात कमी असावे.
  • व्यसनांपासून दूर रहा: मद्यपान आणि धूम्रपान आरोग्यासाठी घातक ठरू शकते, त्यामुळे ते टाळावे.
  • अति उष्ण पदार्थ: निसर्गातः उष्ण असलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवावे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button